Friday, November 16, 2007

ठकूनी लिहिलेलं...

ठकूचा पहिला हक्काचा वाचक होती आई. लिहिलं म्हणून कौतुक करत लिखाणावर मात्र सडेतोड प्रतिक्रिया देणारी तिची आई. आवडलं की "लोक म्हणतात माझ्यातून आलंय लिखाण तुझ्याकडे पण माझ्यापेक्षा फारच चांगलं लिहितेस!" असंही म्हणणारी आई.
ठकूनं कथा लिहिली तर स्पर्धेला पाठव गं म्हणून असं सीसीयू च्या बेडवर आडवं पडून ठकूला बजावणारी ठकूची आई. कथास्पर्धेत बक्षिस मिळवल्यावर ठकूपेक्षा डोंगराएवढा आनंद झालेली आई. आपलं आजारपण विसरून तिच्या बक्षिससमारंभाला आलेली आणि लहान मुलीसारखी खुश झालेली आई. आई खूप नाजूक झालीये, घट्ट मिठी मारली तरी तिला दुखेल कुठेतरी, मांडीवर डोकं ठेवलं तर तिला पेलणार नाही म्हणून नुसताच आईचा हात धरून बसलेली ठकू. "आता लिहिन मी आई!" आईच्या डोळ्यातलं चमचम चांदणं पाहून ठकूनी आईला सांगितलं.
ठकू नंतर कसलासा प्रवास करून आली आणि त्याबद्दल भारावून गेली. आईला फोनवरून सांगितलं थोडंसं आणि बाकीचं आले की सांगते म्हणाली. ठकूनी सगळ्या प्रवासाबद्दल लिहिलं आणि पाठवून दिलं दिवाळी अंकासाठी. आलं छापून की आईला सरप्राईज देऊ म्हणून..
पण... आई गेली सोडून ठकूला त्याआधीच. ते लिखाण दाखवलं असतं तर गेली नसती ती ठकूला सतत वाटतंय...
तेच हे लिखाण
http://www.maayboli.com/node/602

4 comments:

एका भटक्याचा ब्लॉग said...

खूप छान वाटलं, इतक्या दिवसांनंतर तुझ्या ब्लॉग मध्ये तुझे शब्द दिसल्यावर.

Dr.Ulka Joshi Nagarkar said...

thakuche pravasvarnan sunder jamlay

Unknown said...

छान😓

Unknown said...

छान😓

Search This Blog