Sunday, November 15, 2009

परत एकदा 'स्वच्छतेच्या बैलाला..'

गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकात लिहिलेल्या माझ्या
स्वच्छतेच्या बैलाला.. (http://vishesh.maayboli.com/node/26) या लेखाच्या संदर्भाने मायबोलीवरच
http://www.maayboli.com/node/4327 या ठिकाणी चर्चा सुरू झाली.
काय करता येऊ शकेल, कसे करता येऊ शकेल इत्यादी बाबींवर उहापोह सुरू झाला.
आणि मग थांबला.

सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेली ही चर्चा आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं मात्र नव्हतं. अनुभवांची आणि चिडचिडीची भर पडतच होती.

या विषयावर एक डॉक्यु करून ती संबंधितांवर हॅमर केली पाहीजे असं काही वाटत होतंच.

मध्यंतरी याच विषयावर एक डॉक्यु ऑलरेडी केलेली आहे असं कळलं होतं. 'Que to Pee' असे त्या डॉक्यूचे नाव आहे. कॉपी अजून मिळालेली नाही त्यामुळे पाह्यलेली नाही.

मी बनवायच्या डॉक्युच्या दृष्टीने रिसर्च मटेरियल जमा होतच आहे. माझं त्या दृष्टीने काम चालूच आहे. मला गरज आहे तुम्हा सगळ्यांच्या मदतीची. आर्थिक मदत नव्हे तर संशोधनात प्रत्यक्ष सहभाग याअर्थी.

संशोधनात जे लोक मदत करू इच्छित असतील त्यांच्यासाठी मी काही प्रश्नावल्या तयार करणारे. त्यानुसार त्यांनी आपल्या आजूबाजूला जेजे लोक योग्य वाटतील त्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे जमा करून माझ्याकडे पाठवावीत ही विनंती.

डॉक्यु करण्याच्या दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या काही गोष्टी पुढे सरकल्या आहेत. मधे दुसर्‍या एका एनजीओ साठी मी एक डॉक्यु बनवून दिली त्यामुळे संपूर्णपणे आपण काही गोष्टी करण्याचा अनुभव पदरात आलाय. ती चांगली झालीये असा त्या एनजीओ आणि इतर काही लोकांकडून निर्वाळा मिळाल्याने आत्मविश्वास वाढलाय. अजून एका डॉक्युचं काम मिळाल्याने अजून थोडा अनुभव आणि आत्मविश्वास...
कॅमेरा आणि एडिट सेटप या बाबींचं प्रकरण लवकरंच हातात येणार आहे. अ‍ॅव्हिड सेटप हाताशी असल्याने एडिट शिकणंही सोपं जाणारे. अर्थात हे आमच्या फिचर फिल्मच्या शूट नंतर पण तरीही सेटप असणं महत्वाचं.

बाकी काय काय मुद्दे आणि कसे कसे यायला हवेत याबद्दल कोणालाही काही शेअर करायचे असल्यास मला toiletdocu@gmail.com इथे संपर्क करा.

धन्यवाद,
नीरजा पटवर्धन
on 11/15/2009 01:49:00 PM by नीरजा पटवर्धन | 12 comments  Edit

12 comments:

Anonymous said...

मराठीब्लॉग्जवरून इकडे आणि मग उलटा मायबोली आणि मग दिवाळी अंक अशी उलटी फेरी मारून आलो.
भावना पोचल्या; कुचंबणा कळली.
डॉक्यु संबंधी होईल ती मदत करायला आवडेल.





ता.क. पब्लिक टॉयलेट्स मधे कार्यभाग उरकेपर्यंत श्वास रोखून धरण्याची साधना करत आहे. प्रयत्न करा, अस्वच्छतेचा इफेक्ट तरी कमी होतो!

भानस said...

नीरजा त्रिवार अभिनंदन!!! तुम्हाला स्टार माझा स्पर्धेत दुसरे बक्षिस मिळाल्याचे पाहून अतिशय आनंद झाला.:)
भाग्यश्री.

Abhijit Dharmadhikari said...

हार्दिक अभिनंदन!

Priya said...

संशोधनात शक्य असेल ती मदत करायला आवडेल. काम चालू करशील तेव्हा माझ्या ब्लॉगवर अथवा फेसबुक, ऑर्कुट, ईमेल कसंही कळव. शुभेच्छा, आणि ’स्टार माझा’ बद्दल अभिनंदन!

paps sapa said...

Congrax.... :)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

तुम्हाला प्रोजेक्टसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद सुध्दा!

आश्लेषा said...

Hi Neeraja,

I would like to contribute in your project. You can contact me on my gmail id whenever you require any help.

All the best :)

Thought Facet said...

Hi,
Those who are really interested in solid waste management can visit an article 'I own my Garbage' written by Mr. Amey Joshi on our blog http://thoughtfacet.blogspot.com

नीरजा पटवर्धन said...

Sir,
You are talking about garbage disposal.
We here are talking about basic toilet fascilities for women.
Related issues but not all the same.

नीरजा पटवर्धन said...

Sir,
You are talking about garbage disposal.
We here are talking about basic toilet fascilities for women.
Related issues but not all the same.

Thought Facet said...

Yep,
that's right. But I suppose that I have clearly specified the words 'Solid Waste Management'. But I think the topic belongs to the same domain. Anyhow no offence from my side.

आश्लेषा said...

This piece of information might be interesting for you.- http://www.indianexpress.com/news/public-toilets-and-patriotism/593496/0

Search This Blog