सकाळची कामं उरकणं चालू होतं. अचानक मोठ्या आवाजात पखवाज आणि पेटीच्या दमदार साथीने अभंग ऐकू आले. शब्द लांबून येत होते त्यामुळे कळले नाहीत पण सूर होता सच्चा आणि खणखणीत बंदा रूपया.
एकेक सूर पांडुरंगाच्या पायाकडे नेणारा. मधेच एक दुसरा आवाज आला. योग्य जागी, योग्य वेळी आणि योग्य सूर उचलून अप्रतिम ताना आल्या. परत पहिला आवाज मूळ अभंगावर आला. आता दोन्ही आवाज पांडुरंगाला आळवत होते.
अशी स्वर्गीय भक्ती.. का नाही...
Saturday, November 21, 2009
Friday, November 20, 2009
ब्लॉग माझा
आज सकाळी एक मेल येऊन थडकली मेलबॉक्समधे.
त्यात लिहिलं होतं की माझ्या आतल्यासहीत माणूस या ब्लॉगला म्हणजे तुम्ही आत्ता वाचताय त्या माझ्या ब्लॉगला स्टार माझाच्या मराठी ब्लॉगस्पर्धेत दुसरं बक्षिस मिळालं.
मलातरी आनंद झाला बुवा आणि तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याचा मोह काही आवरला नाही. स्वतःचं कौतुक करून घ्यायला कोणाला आवडत नाही. (तुम्हालाही आवडतंच की!)तर म्हणून हे पोस्ट..
हा पूर्ण रिझल्ट.
RESULT OF BLOG...
Sunday, November 15, 2009
परत एकदा 'स्वच्छतेच्या बैलाला..'
गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकात लिहिलेल्या माझ्या
स्वच्छतेच्या बैलाला.. (http://vishesh.maayboli.com/node/26) या लेखाच्या संदर्भाने मायबोलीवरच
http://www.maayboli.com/node/4327 या ठिकाणी चर्चा सुरू झाली.
काय करता येऊ शकेल, कसे करता येऊ शकेल इत्यादी बाबींवर उहापोह सुरू झाला.
आणि मग थांबला.
सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेली ही चर्चा आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं...
Subscribe to:
Posts (Atom)