आवडला. फ्रेश वाटला. खोटा नाहीये. अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे. सुदैवाने आमिरची लुडबुड दिग्दर्शनात नाहीये हे कळतं आणि ते बरं वाटतं.
कंटाळा बिलकुल येत नाही.
पण It did not touch my heart!
>>>नक्षीच्या प्रेमात, ट्रीट्मेंटच्या प्रेमात अडकल्या सारखा टेंटेटीव्ह होतो.<<<
हे एका मित्राने मायबोलीवर लिहिलंय त्याला अगदी अगदी. खूप सारे जागतिक सिनेमाच्यांतले क्लीशे वापरल्याचं जाणवलं. पण किरण रावची पहिली फिल्म आहे आणि त्यामुळे हे साहजिकच. पेंटरच्या मागे बेगम अख्तर यांची ठुमरी हा ठार क्लीशे असला तरी मला आवडला. स्मित
आमिर मिसफिट एकदम. त्याची देहबोली पेंटरची नाहीच वाटत. पेंटींगची सुरूवात तो पिवळ्या, लाल रंगातून करतो, त्याच्या टेक्निकमधे/ हात चालवण्यात तो अक्षरशः कॅनव्हासवर तुटून पडताना दाखवलाय, त्याच्या स्ट्रोक्समधे प्रचंड अनरेस्ट आणि रॉ इमोशन दिसते. पण बाकीच्या वेळेला तो फारच ढोबळ आणि डेड परफॉर्म करतो. तो टिपिकल बॉलिवूड काढू नाहीये शकलेला स्वतःतून. आणि एक अगदी बारीक गोष्ट पण मला खूपच खटकली ती म्हणजे पेंटींग पूर्ण होतं तेव्हा कॅनव्हासवर आपल्याला यास्मिनचा चेहरा दिसतो. too much realistic आणि त्या चेहर्याच्या लाइन्सची शैली ग्राफिक डिझायनर्स सारखी जास्त वाटते. त्या चेहर्याची स्टाइल (स्केचिंगची स्टाइल) ही बाकी पेंटींगशी किंवा त्याच्या तोवर दाखवलेल्या स्टाइलशी मेळच खात नाही.
पण आमिरचा अभिनय बाजूला ठेवला तर स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शन पातळीवर त्याचं कॅरेक्टर स्केच कुठेही लूज एन्डस नसलेलं वाटलं. का कुणास ठाउक पण बास्किया चित्रपटातील स्क्रीनप्ले व दृश्य हाताळणीचा प्रभाव आमिरच्या, विशेषत: त्याच्या चित्रकला जगताच्या अनुषंगाने येणार्या सीन्समधे खूपच ठळकपणे जाणवला.
यास्मिनचा प्रेझेंस मस्तच आहे. पण ती जेव्हा दिसत नाही आणि बोलते ते आणि दिसते तेव्हा बोलते ते यात सेन्सिटीव्हिटी, व्यक्तिरेखा या पातळीवर खूप म्हणजे खूपच फरक जाणवतो. दोन वेगळ्या व्यक्तिरेखा असाव्यात इतपत. पण ही अॅक्टर फारच मस्त आहे. काय चेहरा आहे तिचा मस्त.
शायचं कॅरेक्टर आणि देहबोली कुठेही खटकत नाही. मस्त केलंय तिनं. पण शर्मिला म्हणाली तसंच तिचं फोटोग्राफर असणं हे मुंबई दाखवण्यासाठीचं डिव्हाइस खूप क्लीशे आहे. बाकी दोघांकडे एकच धोबी कपडे धुवत असणं हा थोडा जास्त घडवलेला योगायोग वाटला.
आता मला फारच आवडलेला म्हणजे प्रतिक... मी ठार झालेली आहे. स्मित
शर्मिलाने वरती मेन्शन केलेले १-२ क्षण सोडता खटकलेली एकच गोष्ट म्हणजे त्या कॅरेक्टरचं जिगलो असणं. फिल्मला त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याने काही भरही पडत नाहीये आणि मुन्नाचा वावर, देहबोली यामधे जिगलो असण्याने आलेलं एक निर्ढावलेपण किंवा तत्सम काही दिसतही नाहीये.
प्रतिक टू मच आवडेश...:)
सिनेमॅटोग्राफी सुरेख.
पण मुंबईचं कॅरेक्टर खूप नेहमीसारखं पाउस, समुद्र, गणपती विसर्जन, गर्दीच्या गल्ल्या, लोकल ट्रेन, भाई एवढंच का हा प्रश्न नक्की पडला. यास्मिनच्या नजरेतून ते बघतोय तिला हेच पटकन दिसणारे इत्यादी मुद्दे मान्य केले तरी हा दिग्दर्शनातला रॉनेस असं म्हणावसं वाटतं.
पण पावसामधे मुन्नाच्या घरात पाणी गळणं, वरती त्याने प्लास्टीक घालणं हे खूप खरं आणि प्रामाणिक होऊन जातं त्यामुळे तो रॉनेस माफ बाईंना. स्मित
>>>मुंबई टिपायला कॅरेक्टरचं फोटोग्राफर असणं हेही आता खूप क्लिशे झालय आणि मधे मधे दाखवलेल्या फोटोस्लाईड्सही एरवी फोटोएक्स्झिबिशन्समधून वगैरे अनेकांनी अनेकदा टिपलेल्या त्यामुळे क्लिशे वाटणार्याच होत्या पण हिंदी सिनेमाच्या पडद्यावर बहुधा पहिल्यांदाच आल्या त्यामुळे हेही ठिक आहे(डबेवाले वगैरे). <<<
याबद्दल शर्मिलाला अनुमोदन.
पण नक्की नक्की पहावा असा चित्रपट. २ लोकांबद्दल माझ्या अपेक्षा वाढल्यात मात्र. किरण राव आणि प्रतिक.
- नी