बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं. वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं. तर तेच सगळं तुमच्या पर्यंत पोचावं म्हणून जानेवारी २०१८ पासून लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये हा विषय घेऊन सदर सुरू केले आहे. दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी हे सदर येईल. सदराचे नाव आहे ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. थोडी गम्मत, थोडी माहिती असे काहीसे स्वरूप आहे या सदराचे.
संपूर्ण लेख ब्लॉगवर टाकणार नाहीये. पण इथे लोकमतच्या लेखांच्या लिंका देते आहे.
- माणसाच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेले आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे अख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो.
हे सर्व कुठून येते? - २९ जानेवारी २०१८
- आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रं ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो.
नेसूचे आख्यान - २७ फेब्रुवारी
- अंगाभोवती कपडे गुंडाळून वस्त्रे तयार करण्याची आयडिया फक्त भारतीय उपखंडातली नसली तरी अंतरीयाचे किंवा कमरेवर बांधलेल्या वस्त्राचे काष्टा घालून दुटांगीकरण हे मात्र केवळ भारतीय उपखंडातच दिसून येते.
'साडी नेसणं...' - २७ मार्च
- उगाचच शरीर झाकून ठेवण्याला नकार देणारी, शरीराचे आकार-उकार स्पष्ट करणारी वस्रं ही आपल्या भारतातच अस्तित्वात होती. ऐकायला, वाचायला गैरसोयीचं वाटलं तरीही हे आपल्याच महान संस्कृतीत घडलं..
'झाकपाक' - २४ एप्रिल
- माणसं प्रवास करतात, स्थलांतर करतात, नवीन प्रदेश पादाक्रांत करतात. आपल्या जगण्याच्या पद्धती या नवीन ठिकाणी घेऊन जातात आणि नवीन ठिकाणच्या पद्धती आत्मसात करतात. नवीन प्रदेश पाहून, तिथल्या नवीन आणि मजेमजेच्या गोष्टी प्रवासी लोक आपल्या बरोबर घेऊन येतात. नवीन आलेल्या पद्धती आणि स्थानिक पद्धतींचा मिलाप होतो आणि संस्कृतीची कथा नवं वळण घेते..आपलं काय काय म्हणायचं? - २९ मे
- ब्रिटिश भारतात आले तोपर्यंत भारताच्या वस्त्नकलेनं खूप प्रगती केलेली होती. भारतभरात प्रदेशानुसार कापड विणण्याचे प्रकार, त्यावरची नक्षी, कलाकुसर, कापड रंगवण्याची भारतीय साधनं आणि प्रक्रि या या सर्व गोष्टींचं प्रचंड वैविध्य होतं. काश्मिरी शालींबरोबरच याही सगळ्याची युरोपातून आलेल्या व्यापार्यांना भुरळ पडली.
भारतीय वारसा - २६ जून
- एखाद्या संस्कृतीशी जोडलेली प्रतीकं, चिन्हं यांची देवाणघेवाण होणं हे अपरिहार्य आहेच,काही प्रमाणात!ते स्वागतार्हही आहे. नक्की किती आणि काय योग्य आणि अयोग्य याविषयी मात्र अजून संभ्रम आहेत.
थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै
- रोमानिया देशाचं फॅशनला वाहिलेलं एक मासिक.बिहोरच्या लोकांबरोबर त्यांच्या पारंपरिक भरतकाम कलेसाठी उभं राहिलं. आयुष्यभर भरतकाम करणा-या हातांनी आपल्या सुया, कात्र्यांनीशी लढायचं ठरवलं. बिहोरचे लोक अणि हे मासिक यांनी एकत्र येऊन बिहोर फॅशनचा एक ब्रॅण्ड तयार केला. आपल्या हातांनी बनवलेल्या सगळ्या पारंपरिक वस्तू योग्य नफा आकारून, पण तरीही सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत ऑनलाइन विकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसात दणदणीत विक्रीचा एक उच्चांक गाठला गेला.
बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी - २८ ऑगस्ट
- युरोपातले उच्च खानदानी लोक आणि सत्ताकेंद्र यावर फॅशनच्याद्वारे नियंत्नण ठेवण्याची चौदाव्या लुईची योजना होती. उच्च अभिरूची, चोखंदळ,शानदार राहणीमान, विलासी जीवन या गोष्टींचं केंद्र फ्रान्स असलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. उंची आणि महागडी कापडं,कपडे, आभूषणं आणि इतर वस्तू फ्रान्समध्ये बनवल्या जाव्यात हे त्यानं घडवून आणलं.
कूत्यूरोद्योग - २५ सप्टेंबर
नेसूचे आख्यान - २७ फेब्रुवारी
'साडी नेसणं...' - २७ मार्च
'झाकपाक' - २४ एप्रिल
भारतीय वारसा - २६ जून
थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै
बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी - २८ ऑगस्ट
कूत्यूरोद्योग - २५ सप्टेंबर
- ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाहिलीस का तिची? कॉटनबिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाइन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात?’ ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रिणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूजकाकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता. साधेपणाच्या नोंदी - ३० ऑक्टोबर
- माणसानं कापड, रंग यांच्या साहाय्यानं शरीर झाकायला आणि सजवायला सुरू केलं तेव्हापासून कातडीवरचं आवरण हे त्या माणसाबद्दल बरंच काही सांगणारी दृश्यभाषा आहे. आणि ती वाचायला शिकणं ही मजेची गोष्ट आहे.
शब्देविण संवादु! - २७ नोव्हेंबर
- जानेवारीपासून 'कापडाचोपडाच्या गोष्टी' हे सदर लिहिले. आजच्या 'अजून थोडी इतिहासाची पानं!' या लेखाने सदराचा समारोप करते आहे.
अजून थोडी इतिहासाची पानं - २५ डिसेंबर
शब्देविण संवादु! - २७ नोव्हेंबर