लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक फ्लॉवर
एक छोटा बटाटा (ऑप्शनल आहे)
तूप (फोडणीसाठी) - २ छोटे चमचे किंवा फ्लॉवरच्या क्वांटिटिप्रमाणे
जिरे, हिरवी मिरची, मीठ, लिंबू
दाण्याचे कूट
किंचित साखर
कोथिंबीर

क्रमवार पाककृती:
फ्लॉवर व्यवस्थित बघून मग बारीक चिरून, धुवून घेणे.
साखर, मीठ, लिंबू आणि दाण्याचे कूट याच वेळेला फ्लॉवरमधे मिक्स करायला हरकत नाही.

बटाट्याच्या पातळ काचर्या करून घेणे.
कढईत तूप घेणे, वितळवणे
फोडणीत जिरे, तडतडल्यावर हिरवी मिरची घालणे
त्यात बटाट्याच्या काचर्या परतून किंचित वाफ.
काचर्या शिजल्या की बारीक चिरलेला फ्लॉवर (साखर, मीठ, दा कू आणि लिंबू मिश्रीत) कढईत घालणे. परतणे.
साखर, मीठ, दा कू आणि लिंबू हे आधी घातले नसल्यास आता घालणे.
मिक्स करणे, परतणे, फ्लॉवर शिजेपर्यंत एक वाफ काढणे...

भाजी तय्यार!
वरून सढळ हाताने बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवणे

वाढणी/प्रमाण:
साधारण २ माणसांसाठी दोन भाजी पोर्शन्स प्रत्येकी.
अधिक टिपा:
ज्या मुलांना फ्लॉवरच्या नेहमीच्या भाजीचा वास आवडत नाही ती मुले ही भाजी मिटक्या मारत खातील.
डब्यात देण्यासाठी, पोळीभाजीचा रोल करून देण्यासाठी म्हणून एकदम उत्तम भाजी.
ही भाजी दह्याबरोबर अप्रतिम लागते.
पोळीबरोबरच खायची गरज नाही. नुसती प्लेटमधे साबुदाणा खिचडीसारखी घेऊन वरून घट्ट दह्याची कवडी आणि उपासाचे लिंबू लोणचे... अहाहा स्वर्ग!!

माहितीचा स्रोत:
माझ्या आईची रेसिपी
0 comments:
Post a Comment