
पावसाळा संपतानाचं वातावरण. जिकडे तिकडे हिरवं
गार. आम्ही मस्तपैकी तळकोकणातल्या वाड्यावस्त्यांमधून फिरतोय. कामासाठीच
पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर की कामाचा ताण तसा वाटतच नाही.
रोज
रात्री नकाशा समोर ठेवायचा. एक दिशा, एक रस्ता पकडायचा आणि त्या भागातली
सगळी बारीक सारीक गावं, सगळ्या वाड्यावस्त्यांसकट...