Saturday, November 5, 2016

नी च्या कहाणीची दोन वर्षे!

फेसबुकवर ’आजच्या दिवशी त्या वर्षी’ असा खेळ चालतो रोज. त्या खेळात आजच्या भागात दाखवलं की माझ्या ताराबाई दगडूराम उद्योगाचे नामकरण दोन वर्षांपूर्वी पाच नोव्हेंबरलाच झाले. मी नुसत्याच तारा वळत होते, दगड गुंडाळत होते, त्यातून चित्र शोधत होते, काही थोडे सुंदर असे हातून घडलेही होते. त्याच वेळेला एका मैत्रिणीने...

Thursday, November 3, 2016

दिवाळी दिवाळी दिवाळी!

दिवाळीच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी दिवाळी अंक हा एकमेव प्रकार मला हल्ली आपलासा वाटतो.  अनेक नवेजुने लेखक आपापले सुंदर लिखाण खास दिवाळी अंकांसाठी राखून ठेवतात. त्यामुळे वाचणार्‍याला मेजवानीच असते.  हल्ली जरा आमचे येथे लिहिण्याचे परत मनावर घेतलेले असल्याने त्या मेजवानीतला इलुसा वाटा माझ्याकडूनही आहे.  यावर्षी दोन दिवाळी अंकांमधे माझे लिखाण आहे. दोन्ही अंक आंतरजालावर आहेत त्यामुळे सर्वांना...

Wednesday, September 14, 2016

लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea)

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.----------------------------------------------------------------------------------लागणारा वेळ:  ५ मिनिटे लागणारे जिन्नस:  बर्फाचे तुकडेकोकाकोलालिंबूपुदिन्याची पानेउंच ग्लास दारवा५ व्हाइट दारवा१. व्हाइट रम२. सिल्व्हर टकिला३. व्होडका४....

कैरी मार्गारिटा व कैरी आंबा मार्गारिटा

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.----------------------------------------------------------------------------------लागणारा वेळ:   तयारी + ५ मिनिटे लागणारे जिन्नस:  बर्फकैरीचा रसपिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस (ऑप्शनल)मीठमिक्सर दारवाव्हाइट/ सिल्व्हर टकिलाकुठलीही ऑरेंज...

Monday, September 12, 2016

सबटायटल्सच्या नावानं!!

एवढ्यातच सबटायटल्स किती विचित्र असतात यासंदर्भातले उदगार वाचायला मिळाले. ते वाचून सबटायटल्स या प्रकाराबद्दल ’जे जे आपल्यास ठावे, ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन!’ या भावनेने सबटायटल्स बद्दल काही प्रवचन करणार आहे. तुम्हाला चित्रपट ज्या भाषेतला आहे ती भाषा येत असेल तर ती सबटायटल्स तुम्ही वाचण्यासाठी नाहीत. सिनेमा बघा. सबटायटल्स वाचण्यात आपला वेळ घालवू नका. पण ते करायचेच असेल...

Wednesday, February 17, 2016

अद्भुताचा प्रवास!

हा प्रवास ऑक्टोबर २००७ मधला आणि लिखाणही तेव्हाचंच. २००७ च्या मायबोली दिवाळी अंकात हा लेख होता.  ------------------------------------------------------------------------------------------------------- "किती वळणं, आणि रस्त्याला एक पाटी नाही. काय तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातले रस्ते रे!" मी वैतागून...

Tuesday, February 16, 2016

देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!

'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!' असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्‍या पुष्पाने जाताना सांगितली. माझे वय ७ आणि तिचे वय १५. तिने नववीत नापास झाल्यावर शाळा सोडली होती. एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे...

Sunday, January 3, 2016

नटसम्राटाचे साम्राज्य..

मायबोली.कॊम दरवर्षी मराठी भाषा दिवस आयोजित करते. २०१२ च्या वर्षी कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने कुसुमाग्रजांचे साहित्य हा महत्वाचा विषय होता. त्यानिमित्ताने खालीले लेख लिहिला आहे. ------------------------------------------------------------------------------------------- नाटककार वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान. नटसम्राटच्या भाषेची...

Search This Blog