रिपरिप, संततधार, एका लयीत, सतत असा पाऊस पडत राहतो. पावसाच्या शेजारी बसून माझं काम चालू असतं. हाताने काहीतरी घडवण्याचं. पावसाच्या लयीवर डोक्यात शब्द, आठवणी, घटना, वाक्यांचे पुंजके आणि नुसतंच काहीतरी वाटणं - याला हिंदीत एहसास म्हणतात. मराठीत इतका सुंदर शब्द का नाहीये? - असं सगळं घरंगळत असतं. मेंदूचा एक भाग हातातल्या वस्तूच्या घडत राहण्यावर लक्ष ठेवून असतो. बाकी भाग लयदार पावसाबरोबर मोकाट सुटलेला....
Saturday, August 6, 2022
Friday, July 29, 2022
सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ५ - प्रेसिजन बिसिजन
हे प्रत्यक्ष सँटा फे ऑपेराच्या इथले नाहीये पण कॉश्च्युम शॉपचीच गोष्ट आहे म्हणून याच सिरीजमध्ये घेतेय.------ मी आणि केविन एकमेकांच्या कटींग आणि पिनिंगवर हसायचो. कटींग म्हणजे कापड बेतणे आणि बेतलेले दोन कापडाचे तुकडे मशीनवर जोडताना आधी टाचण्या लावायच्या असतात ते पिनिंग. केविनला वेळ लागायचा. मी धडाधड करायचे. त्यामुळे मी माझे नाक खूप वर करायचे. मग यायची बाही. बाही गोल जोडताना - म्हणजे आधी बाही बनवून...
Sunday, June 12, 2022
सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ४ - रिश्ता आया है!
हातशिलाईच्या अड्ड्यात अप्रेंटीस असायचे आणि व्हॉलंटीयर्स. अप्रेंटीस क्वचितच सँटा फे मधले स्थानिक असायचे. तर कॉश्च्युम शॉपच्या व्हॉलंटीयर्स या सँटा फे आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रिटायर्ड बायका असायच्या. शिकत असलेले, शिक्षण संपून खऱ्या जगात उतरू पाहणारे अप्रेंटीस आणि रिटायर झालेल्या, वेळ घालवायला काम करणाऱ्या व्हॉलंटीयर्स असे फार गमतीशीर मिश्रण असायचे हातशिलाईच्या अड्ड्याचे. वयातला आणि अनुभवातला...
Wednesday, June 1, 2022
सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ३ - जूनची लगीनघाई

जून महिना लग्नघाईचा असतो तिकडे. त्या सीझनसाठी घेतलेले गायकनट ते क्रू मधले सर्व विभागांचे लोक रांचवर असतात. रांच म्हणजे ऑपेरा रांच. मुख्य गावाकडून उत्तरेला जायला जुना ताओस हायवे किंवा हायवे 285 पकडायचा. जात राहायचं, जात राहायचं मग एका ठिकाणी डावीकडे ऑपेरा ड्राइव्हवर शिरायचं. थोडा चढ आणि काही वळणे...
Wednesday, May 4, 2022
सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप २अ - मॅगीची आयडिया

गेल्या पोस्टमध्ये मॅगीबायच्या आयडियेबद्दल (हे लिहिल्यावर मजेशीर वाटतेय) सांगितले. अनेकांना नक्की काय गुंडी ते लक्षात आले नाही. साहजिक आहे. अश्या प्रकारचे कपडे आपल्याला पूर्ण अनोळखी असल्याने पटकन लक्षात येणे अवघड आहे. म्हणून ही छोटीशी चित्र-पोस्ट. फोटोमध्ये दिसतंय ते नेहमीचं लेसिंग. कापडाचे य लेयर्स...
Sunday, May 1, 2022
सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप २ - मॅगी रेवूड
'वरच्या मजल्यावर कोण कोण जाणार? मला टेबल बदलायला आवडेल किंवा मला नाही आवडणार. काय बघून ठरवतील वरच्या मजल्यावरच्या टेबलाची टीम? 'रोज सकाळी वेगवेगळ्या टेबलावरच्या अप्रेंटिस लोकांचा स्टेजच्या मागच्या पायऱ्यांवर हातशिलाईचा अड्डा जमायचा. सगळेजण आपापले हातशिलाईचे काम आणि आयुधे म्हणजे उजव्या बाजूला छातीच्या वरती अंगातल्या कपड्यावर टाचून ठेवलेल्या सुया, खिशात रीळ, हातात थिंबल, गळ्यात स्निप्सचे नेकलेस...
Monday, April 25, 2022
सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप - १. थिंबल
लिसा कधीही हात चेक करायची. एका हातात गारमेंट आणि दुसऱ्या हातात सुईदोरा असेच असायचे बहुतेकदा. पण लिसा सुईदोऱ्याच्या हाताचे मधले बोट चेक करायची. त्या बोटात थिंबल घातलेले नसेल तर हातातला गारमेंट काढून घ्यायची आणि जाऊन थिंबल बसवेपर्यंत द्यायचीच नाही. भरगच्च आणि अनेक स्तरवाले गाऊन्स, बरीच अस्तरे असलेले लांबलचक कोटस, खूप स्तर एकवटल्या कोपऱ्यात शिवायची बटणे असे काहीही हाती शिवताना लिसाचा थिंबलचा आग्रह...
Subscribe to:
Posts (Atom)