Saturday, August 6, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप 6 - पाऊस

 रिपरिप, संततधार, एका लयीत, सतत असा पाऊस पडत राहतो. पावसाच्या शेजारी बसून माझं काम चालू असतं. हाताने काहीतरी घडवण्याचं. पावसाच्या लयीवर डोक्यात शब्द, आठवणी, घटना, वाक्यांचे पुंजके आणि नुसतंच काहीतरी वाटणं - याला हिंदीत एहसास म्हणतात. मराठीत इतका सुंदर शब्द का नाहीये? - असं सगळं घरंगळत असतं. मेंदूचा एक भाग हातातल्या वस्तूच्या घडत राहण्यावर लक्ष ठेवून असतो. बाकी भाग लयदार पावसाबरोबर मोकाट सुटलेला....

Search This Blog