Wednesday, October 24, 2007

ठकूच्या ब्लॊगची चम्मतग!

एक होती ठकू. तिच्या मैत्रिणी होत्या शकू, बकू आणि मकू. चौघीजणी भेटल्या की त्यांच्या गप्पा व्हायच्या. पण हल्ली हल्ली या तिघी फार ब्लॊग ब्लॊग करू लागल्या होत्या. आणि आपापसातच हसत होत्या. शेवटी ठकूनं ठरवलं ’मला पण हवा ब्लॊग!’
मैत्रिणींकडून ब्लॊगचं व्रत समजावून घेतलं. नेटवर गेली आणि ब्लॊग काढला आपला. त्याला छानसं नाव दिलं. आपला फोटो लावला. त्याचं रूपडं सजवलं. अगदी तीट पण लावली इवलीशी.
एवढं करून झाल्यावर लिहायला घेतलं. ’त्यात काय रोजची बडबड करतेस तीच तिथे लिही.’ शकू म्हणाली होती. ’दैनंदिनी गं दैनंदीनी!!’ बकूनी चष्मा सावरत सांगितलं होतं. ’माझी चित्रं असतात तिथे.’ मकू हळूच म्हणाली होती. हे सगळं ऐकल्यावर ठकूला सोप्पच वाटलं होतं. पण ठकिनं लिहायला घेतलं आणि झाला की हो घोळ. काहीच सुचेना तिला.
इतकं छान रूपडं सजलंय माझ्या ब्लॊगचं. जे लिहिन ते चांगलंच असायला हवं. कशावर बरं लिहावं? ऒर्कुटवर झालेल्या भांडणाबद्दल लिहावं की गेल्या आठवड्यातल्या ट्रिपबद्दल लिहावं हेच तिला समजेना. सजवलेल्या ब्लॊगला कुरूप करायला तिचं मन घेईना..
मग काय अजूनतरी ब्लॊग तिचा तसाच सजलेल्या मखरात कोराच्या कोरा बसलाय. वाट बघत ठकीची...

16 comments:

जयश्री said...

ठकूबाई.......आम्ही पण बघतोय वाट :)
नव्या ब्लॉगबद्दल खूप खूप शुभेच्छा !!
आता लिहा मात्र भराभर..... वाट बघायला लावायची भारी वाईट खोड आहे तुमची :)

zakasrao said...

ओ ठकुबाई लवकर लवकर लिहा बर.
शुभेच्छा ब्लॊगला आणि तुला. :)

Unknown said...

he he thakutaai mastach, pudhil likhanala shubheccha. :)

हिन्दुस्तानी!! said...

ऍक रहिन ईर ,ऍक रहिन बीर ,ऍक रहिन फत्ते
और एक रहिन हम

ईर बोले चलो ब्लॉग बनाये, बीर बोले चलो ब्लॉग बनाये, फत्ते बोले चलो ब्लॉग बनाये
और हम बोले काहे बनाये?

फिर ईर बनाईन ब्लॉग, बीर बनाईन ब्लॉग फत्ते बनाईन ब्लॉग
और हम भी बना लीन एक ठो ब्लॉग.

फिर ब्लॉग पे लिखे ईर, ब्लॉग पे लिखे बीर और ब्लॉग पे लिखे फत्ते
और हम सोचत है लिखे तो का लिखे?

Dr.Ulka Joshi Nagarkar said...

All the very best Neeraja
keep writing

Suyash said...

Thaku bai,
Blog sajava kee.
Liha ajun...Vaat baghatoy.....

एका भटक्याचा ब्लॉग said...

congratulations madame "thaku"

mastach.

aata to special N.P touch madhye kadhi sajtoy yachi vat baghtoy aamhi ;)

Unknown said...

नीरजा तुझं लिखाण छानच असतं.
पण जरा लवकर लिही.

ठकुबाई अजुन किती दिवस गप्प राहणार आहे?
लवकर बोलतं कर तिला.

पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा!!

Nash said...

Welcome to the blogosphere. Pahile post vaachayla mala paach minute laagli. Devnagari vaachaychi savay naahi :(

Pan he chaangle keles, Orkut messages peksha swatahacha blog asla ki hits vaadhtil...

- Nachiket

TheKing said...

Looking forward to read more from thakee

Unknown said...

ठकुबाई
लिहित रहाच पण लिहायला पाहिजे म्हणून लिहिन्यपेक्षा छान सुचले की लिहा . हां काही रतीब नही की एखाद्या बोरुचे लोक्सत्तेत अड़व्लेले पान नाही

शुभ्हेछा आहेतच

प्रिया said...

are vaa! he paahilach navhata mee.. :)
yeu dyaa naveen likhaaN. vaachaaylaa aawaDel! :)

Pradeep's said...

Mala hi majhich goshta watli !! majha blog evdha utsahane chalu kela ... Ajun kora karkarit ch ahe.
By the way tu ek versatile personality ahes !! Shubhechcha tula .

Dk said...

Wow!! Thkubai aka Neerja, tumhi Blog che tantra smjavun ghtele aani lihilehi phaar chaan!! pn mla ajun My marathi t lihinyache tantra avgt zale nahi!! tenva madat kra aani asch likhan chlu theva! :)

रोहन... said...

रोज काहीतरी नवीन वाचावे या हेतूने नवीन-नवीन ब्लॉग शोधत असतो. कुठलाही ब्लॉग नवीनच वाचायला घेतला की त्या ब्लॉगच्या पाहिल्या पोष्टवर जाउन प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाइल... :D
तेंव्हा अगदी ३ वर्षा जुन्या पहील्यावहिल्या पोष्टवर प्रतिक्रिया आल्याचे पाहून दचकू नका.. आता संपूर्ण वाचायचा आहे तुमचा ब्लॉग.

Akshay Samel said...

eka blogchee hya peksha uttam suruvaat mee aajverchyaa majyaa aaushyaat baghitali navati, kupach vinodatmak keleli mandani aani surekh shabdhaani keleli suruvaat mhnaje aamha blogger ani vachkansati parvanich hoy.

congrats! hya sathi tumhchya blog ver manthan ya purvanit article aalele mhnun te vachunach tumcha blog pahava ya udeshaane visit keli v ek uttam ani khupach sunder asa blog drushtis padala ani blog kasa lihava ya baddal uttam margdarshanhi milale..... thanks ! keep going.... i am waiting for your net blog.... (y) :)))))

Search This Blog