Monday, January 18, 2010

ब्लॉग, ब्लॉगर्स, ब्लॉगिंग....

दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी दुपारी  ४ वाजता पुण्यातल्या पु.ल.देशपांडे उद्यानात मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा पार पडला. ही कल्पना सुचलेल्यांचे आणि सुचल्यानंतर ती सत्यात उतरवणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. आभारसुद्धा!


मेळावा छान झाला अनेक अर्थाने. अनावश्यक औपचारीकता वगळलेली होती पण तरी उगाच अघळपघळ स्वरूप नव्हते. थोडक्यात, सुटसुटीत पण तरीही खूप काही महत्वाच्या गोष्टींची सुरूवात म्हणून मानला जाईल असा छान मेळावा.

मेळाव्यामधे काही छान मुद्दे मांडले गेले आयोजकांकडून आणि माध्यमाइटस वाल्यांकडून (योगेश जोशी आणि प्रसन्न जोशी). तसंच प्रत्येक जण स्वतःची थोडक्यात ओळख करून देत असताना त्यातूनही काही चांगले मुद्दे चर्चेत आले.

ते सगळे एकत्रित स्वरूपात असे...
१. एकूण साहित्यविश्वातलं आणि आयुष्यातलं ब्लॉगिंगचं स्थान, महत्व, कारण इत्यादी.
२. ब्लॉगवरील उस्फूर्त लेखन हा साहित्याचाच भाग असल्याने साहित्य संमेलनाध्यक्ष द.भि.कुलकर्णी यांना त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ब्लॉगबद्दल बोलण्यासाठी निवेदन देणे
३. मराठी ब्लॉगर्सचे एकत्रित अस्तित्व म्हणून गूगल किंवा याहूग्रुपची सुरूवात करणे
४. ब्लॉगसंबंधी तांत्रिक माहीतीची देवाणघेवाण
५. ब्लॉगद्वारे किंवा ब्लॉगिंग चळवळीद्वारे काय काय घडवता येऊ शकते, साध्य करता येऊ शकते
६. ब्लॉग किंवा ऑनलाइन लिखाणातून होणारे वाङ्मयचौर्य आणि त्याबाबतीत काय करता येऊ शकते.
७. मराठी भाषेच्या उत्कर्षाविषयी केले जाणारे प्रयत्न.

हे सगळं चर्चून झाल्यावर वैयक्तिकरित्या ब्लॉगर्सनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि मग हळूहळू सगळे पांगले.

यापुढे...
माझ्यासारख्या केवळ स्वान्त सुखाय ब्लॉग लिहिणारीला किंवा खरंतर कळ आल्यावर रहावत नाही म्हणून लिहिणारीला सगळी चर्चा, उद्दिष्टे पटली असली तरी पचतीलच, झेपतीलच असं नाही. उदाहरणार्थ मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काही प्रयत्न करणे. मी मराठीत लिहित असले तरी ते मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी नव्हे. मला मराठीतंच व्यक्त होता येतं म्हणून मी मराठीत लिहिते. माझ्या लिखाणात बरेचसे शब्द मराठी येत असले तरी प्रत्येक विंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द असं मी करत नाही किंवा अश्या अट्टाहासाने मराठीचा उत्कर्ष होईल असा काही माझा गैरसमज नाही. यातला फोलपणा राजीव सरांनी कधीच समजावून दिलेला आहे. मग मी मराठी भाषेला तारक काम करते की मारक.. माहीत नाही..

ऑनलाइन किंवा ब्लॉगवरच्या वाङ्मयचौर्याच्या समस्येसाठी परिणामकारक कायदे/ नियम आणि यंत्रणा अजूनतरी अस्तित्वात नाहीत.  मराठी ब्लॉगर्सचं किंवा एकुणात सर्वच ब्लॉगर्सचं एकत्रित अस्तित्व या गोष्टी अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करू शकेल का? कुणी वकील ब्लॉगर किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइटस संदर्भात काम करणारं कुणी मार्गदर्शन करू शकेलच. अचाट महत्वाकांक्षी कल्पना आहे पण याबाबतीत विचार करायला काय हरकत आहे नाही का?

मेळाव्याबद्दलचे बाकीचे वृत्तांत इथे बघू शकता..


- नी

14 comments:

रोहन... said...

आपण गेला होतात का? आम्ही हुकवला बघा हा मेळावा... :( बघुयाच पुढे-पुढे काय होतय ते ... गूगल ग्रुप हवा मात्र एक... :)

Anonymous said...

ह्म्म, खरंच एक छान सुरुवात आहे, लेट्स राईड द वेव्ह (लाटेवर स्वार व्हा असंच ना?) :-)
करु काही तरी, सर्वजण मिळुन छान काहीतरी नक्कीच करु.

अनिकेत

Ashish said...

नमस्कार निरजा,
काल आपल्या कडुन आपल्या ब्लॉगची लिंक घेतली खरी पण, नाव काहि केल्या लक्षातच येईना. शेवटी मराठीब्लॉग्स.नेट च्या मदतीने आपल्या ब्लॉग वरती पोहचलो. छान ब्लॉग आहे आपला. सर्व मराठी ब्लॉगर्सची पुन्हा लवकरच भेट होईल हि अपेक्षा.
माझे मत मि माझा ब्लॉग महाराष्ट्र माझा वर मांडले आहे.

Do read it on MaharashtraMajha

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

ब्लॉगर्सच्या मेळाव्याला यायचे सकाळी ठरविले. पण अचानक महत्वाचे काम उपटले आणि राहून गेले. तुम्ही मंडळी ह्या निमित्ताने मराठीची जाण आणि पोज वाढवित आहेत याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. माझा ब्लॉग निमित्त आहे.www.subhashinamdar.blogspot.com तुमच्या कार्यात पहभागी होण्याची इच्छा आहे. माझा उपयोग झाला तर आनंदच वाटेल. पुढची प्रगती जरूर कऴवा. त्यासाठी माझा मेल आहे.subhashinamdar@gmail.com

Anonymous said...

माझी पण इच्छा होती, पण काही पर्सनल कारणामुळे जमलं नाही.. बघु या पुढल्या वेळी..

Pankaj - भटकंती Unlimited said...

मस्त जमून आले सगळे. तुम्हां सगळ्या ब्लॉगर्सने आमचा उत्साह वाढवला. खूप आभार. असेच भेटत राहू.

Pankaj - भटकंती Unlimited said...
This comment has been removed by the author.
संदीप चित्रे said...

वृत्तांताचा दुवा आवर्जून कळवल्याबद्दल धन्स नी.
>> मला मराठीतंच व्यक्त होता येतं म्हणून मी मराठीत लिहिते.
ह्या वाक्याशी १००% सहमत. माझ्या मनातले वाक्य आहे.

बाकी IP Law विषयक ब्लॉगविश्वात बरंच काही करण्यासारखं आहे.

भानस said...

स्नेह मेळाव्यात सामील व्हायचे होतेच पण पैलतिरावरून निदान यावेळी तरी जमण्यासारखे नव्हते. खूप वाईट वाटले. असो पुढच्या वेळी जमेलही. ब्लॊगर्स मेळावा यशस्वी झाला सगळ्यांचे अभिनंदन!

Alhad Mahabal said...

तुम्हीही गेला होतात वाटतं ब्लॉगर्समीटला... व्वा!
गूगल/याहू ग्रूप हवा या मताला पाठींबा...

आल्हाद

alhadmahabal.wordpress.com

अपर्णा said...

छान वाटलं हाही वृत्तांत वाचुन...यावेळी तरी जमणार नव्हतं पाहुया पुढच्यावेळी तरी नक्की...अनेक ब्लॉगर्सना प्रत्यक्ष भेटण्याची मजा औरच असणार हे नक्की...

eksakhee said...

vruttant lihiNyasathee aabhar.ethe basoon vachatanaa tithech aahot ase vatat hote.
sonali

Unknown said...

तुम्ही माज्या पोस्ट ला दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद..माहितीबद्दल हि धन्यवाद..तुम्ही कॉमेंट्स मध्ये एक प्रश्न विचारला होता वहीच्या पानाबद्दल तर नक्की आठवत नाही पण असाच सर्च करून ते टेम्प्लेट मला सापडले

shri8131 said...

मराठी ब्लोगेर्स नी एकदातरी शुभानन गांगल यांचे काय म्हणणे आहे ते समजून घ्यावे. "सोपी मराठी खरी मराठी" हे पुस्तक जरूर वाचावे.
"शोध मराठीचा" हा शुभानन गांगल आणि यमाजी मालकर यांचा उपक्रम काय आहे? कशासाठी आहे?

Search This Blog