Wednesday, March 31, 2010

साथ


कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्‍या आजी, हात पाय सुजलेले आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा आणि मग एक छोटा पण खडा चढ संपवायचा की आलंच घर....
सगळं कसं एकमेकांच्या साथीनं.. किती काय काय दिवस पाह्यले असणार त्यांनी. कित्ती वर्षं कुणास ठाऊक. आत्ताचेही दिवस कष्टाचे असतीलच की पण तरी डोक्यात जास्वंद का होईना माळण्याइतक्या आजी उत्साही होत्याच.
ते दूर जाईपर्यंत, डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे मला दिसेनासे होईपर्यंत मी त्यांच्याकडेच बघत राह्यले. हे असंच कायम रहावं अशी इच्छा करत आणि तोच आशिर्वाद त्यांच्याकडे मागत....
- नी

9 comments:

Random Thoughts said...

Lovely.Short and sweet.

प्रमोद देव said...

छान!
साथीदार...खरेखुरे!

kshipra said...

sahicha. मला ठाण्याला (बहुतेक) खवैय्यामध्ये अशीच एक जोडी दिसली होती. आम्ही आमचा नंबर यायची वाट पहात हो्तो. खूप भूक लागली होती. आजोबा शांतपणे आजींना चहा बशीत ओतून देऊन बशी धरायला मदत करत होते. आजींचा चहा संपला आणि मग आजोबांचा हात धरुन आजी उठल्या तेव्हा लक्षात आले कि आजींना कमी दिसत होते. मी त्यांचे फोटो पण काढून ठेवले आहेत पण पोस्ट केले नाही.आज हे फोटो पाहून त्यांची आठवण आली.

आधीच्या घराजवळ एक जोडी होती. आजोबा जवळच असलेल्या लाकडाच्या कारखान्यात काम करायचे. आजी दोने घरचे चरकाम करायच्या. तिथे एक पडवीसारखी जागा होती. हेवा वाटावा असा संसार होता त्यांचा. एक तवा, एक परात, एक दुधाचे भांडे, एक कालवणाचे भांडे, एक उलथनं, एक डाव आणी दोन कप. चुलीवर स्वैपाक. एका छोट्या कपाटात कपडे आणि चार गोधड्या दोन अंथरायला आणि दोन पांघरायला. त्यांना पाहून नेहमी विचार यायचा की इतक्या कमी गरजांमध्ये आपल्याला रहाता येईल का?

नीरजा पटवर्धन said...

खरंय क्षिप्रा.. आपणच आपल्या गरजा अमाप वाढवून ठेवलेल्या असतात...

HAREKRISHNAJI said...

दिनांक ९ मे २०१० रोजी दादर, मुंबई येथे मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा आयोजीत केला आहे. येथे येणॆ आपल्याला जमेल काय ?

Read more: http://www.mogaraafulalaa.com/2010/04/blog-post_06.html#ixzz0kJREldan

नीरजा पटवर्धन said...

atta sangata yene khup ashakya aahe. aayatyavelelach kalu shakel. kay karanar sadhya paristhitich tashi aahe kamachi.
tasa mi kalavalay already. :)

Anonymous said...

khup chaan post. sparshun janari. aani jagaw kas he saangnaari suddha.
kharach aaplya garaja aapanach wadhwun thewlyat. Itakya ki pratyek paawlawar kuthalya na kuthalya kubadichi garaj padate. ek jari kubadi nistali tari hatbal hoto aapan agadi sahaj pane.

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

निरजा, फारच बोलके शब्द आणि चित्र.ह्यांना एकटे सोडून जे पैसा मिळविण्यासाठी गेलेत त्यांची कीव करावीशी वाटते. आज यांना गरज आहे, त्या आस-याची.

तुमच्या या लेखनातून माणुसकीचा झरा पाझरत आहे.

www.globalmarathi.org री तो वाचला आणि लिहिण्यासाठी ईथे संपर्कात आलो.

सुभाष इनामदार

NIKKIHOMESTAY said...

Niraja,
Ajji-Ajobancha photo aani Ek-mekana aasleli sath baghun dole bharun aale. Mala watat ki city peksha gawakade ha olava-maya-prem-aapulki (ke je mhanshil tee) ajun tikun aahe.

Search This Blog