Wednesday, April 21, 2010

बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती

हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.

आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=63994:2010-04-20-18-24-39&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं. बहुतेक दिवसभर आलेल्या प्रतिक्रियांचा ओघ बघता एकही प्रतिक्रिया नेट एडिशनवर प्रसिद्ध न करता त्यांनी ती ओळच सरळ काढून टाकलेली आहे.


तस्मात छापील प्रतीमधे असलेल्या त्या ओळीसकटचा हा स्कॅन. वाचता यावी म्हणून ती ओळ मुद्दामून मोठी केली आहे.



हे असं खोटं छापून येण्याची ही पहिली वेळ नाही.

'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक हे संदीप सावंतच होते. पटकथा आणि संवादही संदीप सावंत यांचेच होते.
अरूण नलावडे यांचा चित्रपटाच्या दिग्दर्शनाशी काहीही संबंध नाही. ते निर्माते आणि प्रमुख नट होते.
तरीही आजवर अनेकदा लोकसत्ताच नाही तर इतर विविध मोठ्या वृत्तपत्रांमधेही अतिशय सहजपणे दिग्दर्शकाच्या नावाच्या ठिकाणी अरूण नलावडे यांचेच नाव बिनदिक्कतपणे छापून आलेले आहे.

चित्रपटाच्या श्रेयनामावली मधे ही चूक नाही. नटमंडळी आणि तंत्रज्ञ(यापैकी मी एक) यांच्याही मनात दिग्दर्शक संदीप सावंतच याबद्दल संभ्रम नाही.

तरीही ही चूक अधूनमधून कोणी ना कोणी करत असतंच.

याला काय म्हणायचं?

नटालाच केवळ ग्रेट मानण्याच्या सामान्यांच्या वृत्तीतून पत्रकारही सुटले नाहीत असं मानायचं?
कि दिग्दर्शक आणि प्रमुख नट यात मोठा फरक असतो हेच या पत्रकारांना समजत नाहीये?
कि जाणूनबुजून नरो वा कुंजरो वा करत काही व्यक्तींकडून पत्रकारांची दिशाभूल केली जातेय?
कि लोकांची दिशाभूल करण्याचं काही व्यक्तींनी कंत्राटच दिलंय?

आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते? चूक झाल्यावर ती निदर्शनास आणून दिली तरीही त्यावर चुकीची दुरूस्ती होत नाही. सगळंच कॅज्युअली घेतलं जातं. यानंतर हेतूबद्दलच शंका यायला लागली तर चूक काय?

आजवर आम्ही (मी आणि संदीप सावंत) यासंदर्भात सार्वजनिकरित्या कधी बोललो नव्हतो. पण हा हेतुपुरस्सर वा हलगर्जीपणाने केला गेलेला माहितीचा प्रसार आता आमच्या नवीन कामासाठी त्रासदायक ठरतो आहे. त्यामुळे हे बोलण्याची गरज पडली आहे.

18 comments:

Anonymous said...

खरं सांगायचं तर सिनेमा मधे दिग्दर्शक कोण आहे हे फार कमी लोकं लक्षात घेतात. सिनेमामधे नट कोण आहे हे बघुनच सिनेमा बघितला जातो. कदाचित हे राखी बाईंनी मुद्दाम केलं नसावं असं वाटतं.
अगदी खरं सांगतो, मला पण आत्तापर्यंत नलावडे हेच निर्माता, दिग्दर्शक आहेत असे वाटत होते. त्यांना पत्र लिहून खुलासा मागवल्यास खरे काय ते कळेल.

shrevaibhavlaxmi multiservices said...

खरं सांगायचं तर सिनेमा मधे दिग्दर्शक कोण आहे हे फार कमी लोकं लक्षात घेतात. सिनेमामधे नट कोण आहे हे बघुनच सिनेमा बघितला जातो. कदाचित हे राखी बाईंनी मुद्दाम केलं नसावं असं वाटतं.
अगदी खरं सांगतो, मला पण आत्तापर्यंत नलावडे हेच निर्माता, दिग्दर्शक आहेत असे वाटत होते. त्यांना पत्र लिहून खुलासा मागवल्यास खरे काय ते कळेल.

नीरजा पटवर्धन said...

>>सिनेमामधे नट कोण आहे हे बघुनच सिनेमा बघितला जातो.<<
प्रेक्षकांचं अज्ञान आणि फिल्ममेकर्सचं दुर्दैव. दुसरं काय.
>>कदाचित हे राखी बाईंनी मुद्दाम केलं नसावं असं वाटतं.<<
मी म्हणतंही नाही त्यांनी मुद्दामच केलं असेल. असेलही आणि नसेलही. पण प्रेक्षकांच्याइतकंच अज्ञानीपणाने पत्रकाराने लिहिणे हे थोडं बेजबाबदारपणाचं वाटतं नाही का?
>>अगदी खरं सांगतो, मला पण आत्तापर्यंत नलावडे हेच निर्माता, दिग्दर्शक आहेत असे वाटत होते.<<
८ निर्मात्यांपैकी एक आहेत. दिग्दर्शक आहेत असं अनेक ठिकाणी कारण नसताना छापलं गेलंय. जे १००% चूक आहे.
>>त्यांना पत्र लिहून खुलासा मागवल्यास खरे काय ते कळेल.<<
दिग्दर्शक संदीप सावंतच आहेत याबाबत कुठल्याच खुलाश्याची मला गरज नाही. कारण श्वासच्या तंत्रज्ञांपैकी मी एक आहे आणि मला माहीतीये दिग्दर्शक म्हणून संदीप सावंत यांच्याबरोबरच मी काम केलंय. असो.

Deepali said...

मला वाटतय कि अगामी चित्रपटाची पब्लिसिटी म्हणून ही चूक जाणुन बुजुन तर नाही केली ??
दिग्दर्शकाच क्रेडिट काढून दुसर्‍याला देणे is very shameful !
कुठलाही चित्रपट हा दिग्दर्शकाचा सिनेमा असतो , अ‍ॅक्ट्र्स फक्त दिग्दर्शकाच्या प्रोजेक्ट चा एक पार्ट असतात!
दिग्दर्शक, कथा ,पटकथा चांगली असेल तरच तो चित्रपट चांगला होतो, कोणी का अ‍ॅक्टर असेना, किती का तगडी स्टार कास्ट असेना जर या ३ गोष्टी जमल्या नाहीत तर कुठलाही सुपरस्टार सुध्दा चित्रपट तारून नेउ शकत नाही.
या उलट उत्क्रुष्ट दिग्दर्शक मात्र साधी स्टार कास्ट असून सुध्द्दा वल्ड क्लास सिनेमा बनवु शकतो , म्हणून दिग्दर्शक च चित्रपटचा आत्मा असतो, कधीही सर्वात् मह्त्वाचा !
अ‍ॅक्टर्स मग ते अगदी शोले ची तगडी स्टार कास्ट का असेना, रमेश सिप्पी- सलीम जावेद आहेत म्हणून त्यातले अ‍ॅक्टर्स आजही जय -वीरु -गब्बर - बसन्ती अजरामर आहेत :).
~Deepali Deshpande

Vivek said...

मी लोकसत्तावर चुकीची दुरुस्ती करावी अशी कॉमेंट दिलीय. पण बर्‍याचदा हे लोक कॉमेंट्स छापतच नाहीत.

अशा ठिकाणी जास्तीत जास्त जणांनी कॉमेट्स दिल्या पाहिजेत.

दीपालीशी १०० टक्के सहमत. चित्रपट हे दिग्दर्शकाचंच माध्यम. दिग्दर्शकाला जे सांगायचं असतं ते तो कथा, अभिनेते, संगीत यांच्या एकत्रित माध्यमातून व्यक्त करतो. ही सांगड नीट जुळून आली की सुरेख चित्रपट बनतो आणि तो पाहावासा वाटतो. व्यावसायिक यशाची परिमाणं वेगळीच असतात. प्रत्येक चांगला चित्रपट व्यावसायिक यश मिळवेलच असं नाही. पण तो विषय वेगळा.

Anonymous said...

मला वाटतं तुमचा गैरसमज झालाय. मला असं म्हणायचं होतं की त्या राखी बाईंकडून त्यांनी असे कां लिहिले? याचा खुलासा मागवा. जर उत्तर दिलं नाही, तर पुढे हेतुपुर्वक गैरसमज पसरवल्या बद्द्ल दम द्या त्यांना.

Kaushal Inamdar said...

प्रिय नीरजा,

वर्तमानपत्र बेजबाबदार असतात याचा मला चांगलाच अनुभव आला आहे. पण या बेजबाबदारपणात श्रोता आणि प्रेक्षक या घटकांचा तितकाच वाटा असतो असं मला वाटतं.
एक श्रोता किंवा प्रेक्षक म्हणून आपल्याला जी कला आपल्या नजरेसमोर निर्माण होतांना दिसते त्याचंच अप्रूप वाटतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यामुळे आपल्याकडे दिग्दर्शकापेक्षा नट मोठे (आणि श्रीमंतसुद्धा!!), संगीतकारापेक्षा गायक मोठे असं चित्र दिसतं. याच कारणासाठी आपण चित्रकार, मूर्तिकार, कवी, आणि चित्रपट किंवा नाट्यक्षेत्राशी निगडित पडद्यामागचे कलाकार (म्हणजे ध्वनिमुद्रक, संकलक, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, कॉस्च्युम डिझाइनर, कला दिग्दर्शक, इत्यादि) लोकांचा योग्य तो आदर सत्कार करत नाही.
मी मध्यंतरी एका फिल्म स्कूल मध्ये शिकवत होतो. संकलक व्हायला आलेल्या मुलांना विचारलं तुमचा आवडता संकलक कोण - तर एकालाही सांगता आलं नाही! छाया दिग्दर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना व्ही.के. मूर्तींचं नाव ऐकवलं तर सगळ्यांच्या चेहर्‍यावर ‘हे कोण असतात बुवा’ असे भाव होते!
याच अज्ञानी श्रोत्यांच्या हातात पेन आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची सोय येते, तेव्हां ते उद्दाम होतात. ज्ञानापेक्षा मतं जास्त असणारी हीच ती पत्रकार मंडळी! अर्थात अपवाद आहेत, पण अपवाद म्हण्ण्या इतकीच त्यांची नावं आहेत!
मी व्यक्तिश: तुझ्या लेखाशी १००% सहमत आहे. सुजाण श्रोता आणि प्रगल्भ प्रेक्षक होण्याकरिता आपणच काहीतरी करायला हवं असं मला वाटू लागलं आहे.

कौशल

Vivek said...

कौशल,

तुमची कॉमेंट वाचून यासंदर्भात लिहावं वाटलं म्हणून हा लेख लिहिलाय:
http://wp.me/pTqlJ-F

Anonymous said...

चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे... हे लोकांना माहीत/कळत नसतं...

राजनिती सारख्या चित्रपटांची प्रसिद्धी रणबीर-कतरीना च्या फोटोज्‌ नी होते यामागचं कारण हेच...

Anonymous said...

ha jo nava chitrapat yet ahe
tya sanbandhit eka vyakticha mala message aala ki aaj kahitari batami aali aahe
mhanun pahila tar hi chuk malahi khatakali hoti
pan ek sangato ithe tya sitevar sangun vgaire kahi hot nahi ...
kahitari thos karave lagel evadhe nakki
mi madatila tayar aahe
( mataviruddh tar kititari lok aavaj uthvanyacha praytn tyanchya site varun karat asatat ,vichar hot nahi ...)
vinayak

Vivek said...

Oh, Neeraja, I can't believe it!

I visited the updated link and found that `that' line is removed, as if it were not there!

Loksatta should have shown the courage to publish the readers' comments and separately post a corrigendum with a link in the original post. A whitewash was not expected of them. No journalism conventions!

They can whitewash the e-version, but not the print edition, and you did the right thing by posting the image here.

Vivek

Star Neelima said...

mi ek media person asle tarihi mala ikde comment karavishi watate karan saglech patrakar murkha nastat,kahi jababdar patrakar hi jagat ahet je yogya ti mahiti jagasamor roj anat ahet...Loksatta sarkhya changlya vruttapatrane keleli hi chuk far mothi ahe.Loksatta kadun lekhi mafi magavi ani ti vruttapatrat chapayla lavavi..
Chitrapatacha sarvesarva ha digdarshak asto he ajun hi kalu naye hi goshta nindniya ahe.Neeraja,mi kahi madat karu shakle tar pls sang ---Neelima

Vibha said...

निसंशय हा बेजवाबदार पणा आहे. कुठल्याही कलाकृतीत दिग्दर्शकाचं स्थान सर्वश्रेष्ठ असतं. प्रेक्षकांनी चित्रपट पाहताना हे भान ठेवायला हवं. नट हा महत्वाचा असला तरी दिग्दर्शक त्याला उभा करतो. किमान वृत्तपत्रात लिहिणाऱ्याने तरी ही काळजी घ्यायला हवी. श्वास चे सर्वतोपरी श्रेय संदीप सावंत ह्यांचे आहे. त्या चित्रपटातील एक कलाकार म्हणून मी सांगते, लहानातल्या लहान गोष्टीवर त्यांनी केलेला विचार, घेतलेले कष्ट मी अनुभवले आहेत. अरुण दादांचा सहभाग महत्वाचा होताच पण संदीपचा काम सर्वात मोठं आहे. मी ह्या घटनेचा निषेध करते.

नीरजा पटवर्धन said...

Thank you all.
Esepecially Vibha.. who was one of the actors in the film... Thanks a lot.

Minanath Dhaske said...

नी,

लोकसत्ता मधले एक व्यंगचित्र देखिल माझ्या व्यंगचित्राशी साधर्म्य असलेले होते. त्यासंबंधी मी व्यंगचित्रकारांशी व संपादकांशी इ-पत्रव्यवहार केला पण कुणालाही त्याची पर्वा नाही.
http://minanath.blogspot.com/2010/01/wise-men-think-alike.html
संपादकाला ही चूक समजणे अपेक्षित आहे. पत्रकार चुकू शकतो.

Rahul Ranade said...

people are very reluctant and they hate to admit their mistakes.... thats even more unfortunate than the mistake itself.

typos are a common factor-but we see that they are corrected by responsible newspapers-here,if the line itself is deleted....then this whole thing stinks.

kujka, ghanerda vaas yeto vinakaran.

Jai Hind,Jai Maharashtra,

Rahul Ranade.
www.rahulranade.com

Niftyplayer7 said...
This comment has been removed by the author.
Niftyplayer7 said...
This comment has been removed by the author.

Search This Blog