आपल्याला उगाच वाटत असतं की आपण खूप लिहीलंय पण प्रत्यक्षात ते तेवढं काही नसतं आणि भलं तर त्याहून नसतं. हा नवीन झालेला साक्षात्कार!
आता का आणि कसं म्हणाल तर माझ्या आयुष्यात लिहिलेल्या सगळ्या कथा काही कारणामुळे मी खणून काढल्या आणि काय सांगू महाराजा त्या एकुणात केवळ सहाच निघाल्या.
ब्लॉगवर मी कधी कथा टाकत नाही माझ्या. पण म्हणलं माझा ब्लॉग वाचणार्यांना माझ्या कथा देऊन पिडायला काय हरकत आहे नाही का?
तर या माझ्या सहा कथा. सुरूवातीच्या कथेपासून आत्ता नुकत्याच पूर्ण केलेल्या ताज्या ताज्या कथेपर्यंत सगळ्या म्हणजे केवळ सहा कथांच्या लिंका. लिंका मायबोलीवरच्या आहेत. बहुतेक तुम्हाला वाचण्यासाठी मायबोलीवर लॉगिन करावं लागेल. किंवा नाही सुद्धा. माहित नाही.
१. या हृदयीचे त्या हृदयी!
ही माझी तशी पहिली कथा. आधी एकदा प्रयत्न केला होता पण तो अगदीच फोल गेलेला पचका होता. तर ही पहिली कथा. २००५ मधे लिहिलेली.
http://www.maayboli.com/node/21321
२. सुंदर माझं घर!
अर्धा भाग लिहून तो तसाच विसरून ठेवून दिला होता. वर्षभराने उरलेली कथा पूर्ण केली. ही बहुतेक माझी सगळ्यात लहान म्हणजे सगळ्यात कमी पिडणारी कथा. २००५ आणि २००६ मिळून लिहिलेली कथा.
http://www.maayboli.com/node/20550
३. मी आणि नवा पाऊस!
ही कथा लिहिताना मजा आली होती. तेच उतरलं बहुतेक त्यात. या कथेला २००७ च्या साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत पहिल्या पाचात बक्षिस मिळालं होतं. श्री. रा. ग. जाधवांनी कथेचं नाव घेऊन कौतुक केलं होतं. आणि मी फुशारले होते. मला मिळालेल्या बक्षीसाने माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या आईला झाला होता. आणि लिहिणं सोडू नकोस असा आग्रह करून ती मला सोडून गेली होती. यानंतर लगेचच.
http://www.maayboli.com/node/21289
४. एका हरण्याची गोष्ट!
ही माझी सगळ्यात लांब गोष्ट असेल बहुतेक. पण मला आवडणारी. २००८ मधे लिहिलेली.
http://www.maayboli.com/node/21285
५. एक होती वैदेही.
आयुष्यातलं पहिलं लिखाण जे मी सुरू एका फॉर्ममधे केलं आणि मग ते सगळं कचर्यात टाकून नवीन पद्धतीने या कथेला सामोरी गेले. रीरायटींग, रिड्राफ्टिंग हे शब्द फक्त ऐकले होते तोवर. या कथेला २००९ च्या साप्ताहिक सकाळ स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं होतं.
http://www.maayboli.com/node/21291
६. देहाची तिजोरी
ही नुकतीच गेल्या महिन्यात पूर्ण केलेली कथा. अजून याच्यावर सेकंड ड्राफ्टचा हात फिरलेला नाही.
http://www.maayboli.com/node/16810
बघा वाचा आणि मला तुमचे अभिप्राय जरूर कळवा. केवळ सहाच कथांवर भागवण्याची इच्छा नाहीये मला. अजूनही लिहायचंय. अजून बरंच सुधारायचंही आहे. सगळ्या अभिप्रायांची मदत होणारे त्यात.
-नीरजा पटवर्धन
Monday, November 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
Tumachi "ek hoti Vaidehi" he katha wachali.
Pharach chan.
Tripati Mahadik
Post a Comment