लफ्फा
हे चित्र तयार करण्याचं मूळ कारण माझ्याकडे संदर्भ-बँक तयार करणं हे आहे. मला कल्पना आहे की डिजिटल पेंटींग म्हणून ह्या चित्राला काही महत्व नाही.
फोटोशॉपमधे आयबॉलच्या पेन टॅब्लेटच्या ( http://iball.co.in/Product.aspx?c=16 ) सहाय्याने हे चित्र तयार केलेय.
लफ्फ्याच्या फुलामधली एक पाकळी आधी पेनने फोटोशॉपमधे काढली. मग ती ३ वेळा रोटेट करून एक चार पाकळ्यांचे फुल बनवले आणि मग तेच फुल रोटेट आर्बिटरी (०.०५ - ०.१ या दरम्यान) क्लॉकवाइज आणि अँटीक्लॉकवाइज दोन्ही करून सगळी फुलं तयार केली. ती योग्य पद्धतीने अॅरेंज करून पहिले त्याची माळ बनवली.
एवढी सिमिट्री मिळाल्यावर मग नवीन लेयर मधे मोती फ्रीहँड काढले. शेड बिड दिली. तीच गोष्ट प्रत्येक फुलाला असलेल्या ३ मण्यांच्या लटकनची. मधल्या फुलावर लाल माणिक रंगवले.
टेक्स्ट टूलमधून श्री लिपीच्या सहाय्याने लप्फा हे शीर्षक दीले.
नवीन लेयर वर पेन माउसने माझी सही ठोकली.
फ्लॅटन इमेज करून लेयर्स दाबले.
-नीरजा पटवर्धन
3 comments:
:) मेहेनत ना? छान आहे! म्हणजे, खराखुरा पण छानच दिसेल! लफ्फा दागिना असाच दिसतो का?? मला ना आयुष्यात कधीतरी एक 'चिंचपेटी' करायचीय बाबा! :p
छाने :) हे तू आधी टाकलं होतं का कुठे ? बघितल्यासारखं वाटतय.
अनघा, जेजे ची ना तू?(जेजे या मुद्द्याबद्दल मी प्रचंड जे आहे. तिथे जाण्यासाठी प्रयत्न करावा अश्या लायकीचा हात नाही त्यामुळे आमची आपली नुसती जे च जे):) मेहनतीशिवाय काही आहे का? :)
हो लफ्फा असाच असतो. म. वि. सोवनींच्या शिवकालीन आणि पेशवेकालीन अलंकार या थिसीस मधून संदर्भ घेतलाय. अर्थात त्यात केवळ लाइन ड्रॊइंग्ज आहेत. ती ड्रॊइंग्ज आणि बाकी वर्णन यावरून मी हे तयार केलंय.
सिंडे, मीच नव्हतं का टाकलं वर्षदीडवर्षापूर्वी माबोवर! मग मधे डो फि तेव्हा सगळं लिखाण उडवलं माझं त्यात हे ही. :)
Post a Comment