Tuesday, December 3, 2019

आनंदवन मोमेण्ट्स!

एक दिवस शीतल आमटेचा मेसेज आला. शीतल सोशल मिडिया मैत्रिण होती बरेच दिवस. तिला माझं वायरवर्क आवडलंय हे ती सांगेच वेळोवेळी. तर तिचा मेसेज आला की आमच्याकडे दिव्यांग लोकांसाठी वायर ज्वेलरीचं वर्कशॉप घेशील का? आनंदवनासंबंधी महारोग्यांची सेवा, उपचार, पुनर्वसन याबद्दल थोडीफार कल्पना होती. समिधा वाचलेले असल्याने...

Tuesday, March 5, 2019

नवीन कलेक्शन येणार!

मार्च महिना आला. दरवर्षीप्रमाणे नवीन कलेक्शन अनाऊन्स करायची वेळ झाली.माझ्या नी ब्रॅण्डला आता ४ वर्षे पूर्ण होतील.अजूनही कासवाचीच गती असली तरी हळूहळू पुढे जाणे नक्की चालू आहे.इथल्या मैत्रिणींना माहिती नसेल पण गेल्यावर्षी नदी ही थीम घेऊन पूर्ण कलेक्शन केले होते. यावर्षी बराच वेळ घेऊन मोठी उडी मारायचा...

Thursday, February 21, 2019

मेकप मेकप मेकप!

एकेकाळी म्हणजे इसपू वगैरे काळातच साधारण लोकांचे मेकअप करायचे मी. ब्रायडल, नाचाचे, शाळेच्या गॅदरींग्जचे वगैरे. ब्रायडल करताना 30 रंगाच्या मुलीला 23 रंगाची करा, साडीला मॅचिंग मोरचुदी रंगाचीच शॅडो लावा, मेकपला पैसे घेता आणि गालावरचा गुलाबी रंग इतक्या कंजूषपणे काय वापरता?, असे बरेच आग्रह नवरीमुलगी आणि इतर जानोश्याचे असायचे. अहो नवरी गोड, सुंदर वगैरे दिसायला हवीये मेकपकी दुकान नाही हे समजवताना मी हैराण...

Search This Blog