मार्च महिना आला. दरवर्षीप्रमाणे नवीन कलेक्शन अनाऊन्स करायची वेळ झाली.
माझ्या नी ब्रॅण्डला आता ४ वर्षे पूर्ण होतील.
अजूनही कासवाचीच गती असली तरी हळूहळू पुढे जाणे नक्की चालू आहे.
इथल्या मैत्रिणींना माहिती नसेल पण गेल्यावर्षी नदी ही थीम घेऊन पूर्ण कलेक्शन केले होते.
माझ्या नी ब्रॅण्डला आता ४ वर्षे पूर्ण होतील.
अजूनही कासवाचीच गती असली तरी हळूहळू पुढे जाणे नक्की चालू आहे.
इथल्या मैत्रिणींना माहिती नसेल पण गेल्यावर्षी नदी ही थीम घेऊन पूर्ण कलेक्शन केले होते.
यावर्षी बराच वेळ घेऊन मोठी उडी मारायचा बेत होता. पण एक काम लांबले आणि यावर्षी अॅनिव्हर्सरी कलेक्शन करताच येणार नाही असे चित्र तयार झाले. आता तेच काम अजून थोडे लांबलेय त्यामुळे मोठी उडी नाही तरी दरवर्षीचा नेम चुकू नये इतपत कलेक्शन करता येणार आहे.
तर यावर्षी छोटेसे कलेक्शन करणार आहे. आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या प्रकारच्या डिझाइन्सचा म्हणजे आदिकथा, रांगोळी, ट्री ऑफ लाइफ, ट्विस्ट विथ ट्रॅडिशन, म्हादेई कलेक्शन, डेट विथ अलेक्झांडर काल्डर इत्यादी सर्व डिझाइन्सचा किमान एकेक तरी नमुना या कलेक्शनमधे असेल. त्याचबरोबर जी मोठी उडी मारणार होते त्याची एक बाळपाऊल म्हणावे अशी झलकही असेल.
ही एक छोटीशी झलक आजवरच्या कलेक्शन्सची
ही एक छोटीशी झलक आजवरच्या कलेक्शन्सची
1 comments:
superb article.
Post a Comment