Sunday, September 27, 2009

उत्तेजनार्थ...!

'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं.मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं. दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला...

माझा 'श्वास' - ४

आधीच्या एका प्रकरणात म्हणल्याप्रमाणे पटकथेच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रीकरण स्थळे शोधणे. त्याप्रमाणे संदीप पुणे परीसरात आणि कोकणातही फिरत होताच. सुरूवात कुठे झाली ते वर आलंच आहे. आत्तापर्यंत त्याने बघितलेल्या जागा पटकथेला आकार देत होत्या. व्यक्तिमत्व देत होत्या. पटकथा अधिक जिवंत व्हावी...

Saturday, September 26, 2009

गणपतिबाप्पा मोरया!

गणपति विसर्जनानंतर ४-५ दिवसांनी ४ गणपति आपल्या विरघळण्याची वाट बघताना दिसले. पैकी एकाने आडवे होण्यापर्यंत मजल गाठली होती. अंगावरचे सोनेरी सोडून सगळे रंग सोडून गेले होते. एकाच्या हातांचे तपशील संपले होते. स्थळः आरोंदा गावातील एक वहाळ. कॅमेरा तपशील - निकॉन कूलपिक्स L 15, ऑटोवर काढल...

स्कार्लेट

मार्गारेट मिशेल च्या Gone with the wind ची नायिक Scarlet o’Hara. काल्पनिक असली तरी कुठल्याही खर्‍या माणसाइतकीच किंबहुना जास्तच माणूस वाटणारी हे स्कार्लेट.मला मात्र ही सुरुवातीला भेटली लिंडा गुडमनच्या 'सन साइन्स' मधून. हसू नका प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेय नक्कीच आपापल्या टिनेज इयर्स मधे. तर ह्या पुस्तकात लिंडा बाई म्हणतात ”Scarlett O’Hara is the very epitome of the Mars-ruled Aries female.”...

Friday, September 25, 2009

माझा 'श्वास' - ३

आजूबाजूला बर्‍याच मालिकांमधून किंवा काही चित्रपटांच्यात बरीच लहान मुले होती पण कोकणातल्या खेड्यातला मुलगा काही सापडत नव्हता. सगळी मुलं एकजात शहरी वळणाची. आणि वर इंग्रजी माध्यमातली होती. आम्ही शोधत होतो. चारी दिशांना दूत पाठवले होते म्हणजे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. मुलगा ६-७ वर्षांचच हवाय हे स्पष्ट...

दूध जमा करून घेणारा माणूस

हा फोटो हुमरस (सिंधुदुर्ग) येथील एका दूध डेअरीचा आहे. वेळ पहाटे ५:३०-६ दरम्यानची. म्हणायला डेअरी असली तरी हे दुधाचे कलेक्शन सेंटर आहे. पहाटे ५:३० ला हा माणूस या टेबलावर येऊन बसतो. सगळी उपकरणी मांडून. दूध घेऊन आलेल्या लोकांच्या दुधातलं फॅट कन्टेन्ट मोजतो आणि दूध जमा करून घेतो. गेली २५ वर्ष तरी हा माणूस...

Thursday, September 24, 2009

माझा श्वास्’ – २

लग्नानंतर आम्ही गेलो मालवणला. मालवणच्या आसपासचा परिसर फिरत होतो. धामापुरच देऊळ ओलांडून तिथून मग नेरूरपार कडे येऊन काळश्याला खाली उतरून वनलक्ष्मीच्या बोटीतून कर्ली नदीमधे फिरून आलो. फार मस्त होता तो भाग. मला आपलं नवीन लग्न झालेल्या मुलिला जसं वाटावं तसं छान छान वाटत होतं तिथे फिरताना आणि दिग्दर्शकाच्या डोक्यात वेगळीच चक्र चालू होती. सगळ्या परिसराची बैजवार माहिती घेऊन ठेवली. काळश्याचे केशव सावंत, वनलक्ष्मीची...

Wednesday, September 23, 2009

माझा 'श्वास' – १

'श्वास' या चित्रपटाने २००४ मधली बहुतांश सर्व पारितोषिके, राष्ट्रीय पुरस्काराचं सुवर्ण कमळ मिळवून इतिहास घडवला. भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटाचा प्रवास मी खूप जवळून अनुभवला. वेशसंकल्पक या नात्याने तसेच इतर अनेक पातळ्यांवर माझे योगदानही दिले. हा माझा प्रवास मी शब्दबद्ध करतेय 'माझा श्वास' या लेखमालेत. ------------------------------------------------------------------------------------- "आपल्याला...

Tuesday, September 22, 2009

गुंडाळलेल्या कापडाची कहाणी!!

लहानपणापासून नव्वारी साडी म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड, गूढ आणि एकदम खानदानी प्रकरण असावं असा एक समज बसला होता डोक्यात. माझी आजी काही नव्वारी नेसत नाही. पण नव्वारी नेसणार्‍या लांबच्या आज्या घरी आल्या की मला खूप मस्त वाटायचं. आपल्या नात्यात पण हे अवघड आणि खानदानी प्रकरण आहे याचं समाधान वाटायचं. पण तरी कधी नव्वारी नेसून बघण्याचा प्रयत्न केला नव्हता. 'जाणता राजा' नाटकात मी सामील झाले मग नव्वारी नेसायला...

Search This Blog