मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
-------------------------------------------------------------------------
दरवर्षी काहीनाकाही कारणाने राहून जात होतं ते अखेर यावर्षी घडलं. यावर्षीच्या उत्सवाला हजेरी लागलीच.
७ - ८ दिवस नुसती धुमशान.
सकाळी उठून धडाधडा आवरून सिनेमॅक्स, वर्सोवा (तेच ते इन्फिनिटी मॉलमधलं!) गाठायचं. थेट्राबाहेर लायनी लावायच्या. जागा पकडायच्या. सिनेमा बघायचा. संपला की एक्झिटच्या दारातून पळत पळत ४० पायर्या उतरायच्या दुसर्या बाजूचा जिना गाठायचा परत सिक्युरिटीसाठी पर्स उचकायला द्यायची आणि ते झालं की पळतपळत दुसरीकडच्या ४० पायर्या परत चढायच्या. परत थेट्राबाहेर रांगेत. रांग लावायची म्हणून जेवण स्किप करायचं. किंवा रांगेत ४-५ जणांनी मांडा ठोकून बसायचं आणि तिथेच जेवायचं, घुसायला लागले लोक तर आरडाओरडा करायचा, कसतरी मरतमरत आत घुसायचं आणि परत तेच... रात्री थकल्या डोळ्यांनी घरी. अधल्यामधल्या वेळात उद्याच्या फिल्म्स कोणत्या, कुठल्या बघायच्या याचा कॅटलॉगमधून अभ्यास करायचा. कॅटलॉगमधे पुरेशी माहिती नसेल तर रात्री गुगलायचं. 'उद्या सकाळी अमुक वाजता स्क्रीन अमुकच्या लायनीत भेट' असले समस...
मज्जा न काय एकुणात!
१३-२० ऑक्टोबर २०११ या काळात घडलेल्या 'मामि' चित्रपट महोत्सवाची ही गोष्ट. दिवसाला प्रत्येक माणूस ५ चित्रपट बघू शकतो. माझी रोजच तेवढी क्षमता नव्हती. किंवा कधी चित्रपट सुरू झाल्यावर १० मिनिटात बकवास म्हणून बाहेर यायचो आम्ही मग पुढच्या चित्रपटासाठी रांग असायचीच त्यामुळे रांगेत तंबू. असे करून एकुणात २५ तरी सिनेमे बघितले गेले.
यावर्षीचं 'मामि' चं चित्रपटांचं कलेक्शन मस्त होतं यात वाद नाही. साधारण ७-८ स्पर्धात्मक आणि अ-स्पर्धात्मक विभाग ज्यामधे कान महोत्सवात नावाजले गेलेले चित्रपट, फ्रेंच सिनेमा, गाजलेले भारतीय चित्रपट यांपासून मुंबई या विषयावर नवख्या/ विद्यार्थी फिल्ममेकर्सनी केलेल्या शॉर्ट फिल्म्स असे सगळे रंग होते. या विविधरंगी गुच्छाबद्दल फेस्टिव्हल प्रॉग्रॅमिंग टीम आणि सिलेक्शन टीमचे विशेष अभिनंदन आणि आभार.
यावर्षी पहिल्यांदाच सिनेमॅक्समधे हा महोत्सव होत होता. सिनेमॅक्स, वर्सोवा हे मुख्य ठाणे तर सिनेमॅक्स, वडाळा आणि मेट्रो ही अजून दोन ठाणी या महोत्सवाची केंद्रे होती. सिनेमॅक्सच्या स्टाफला वेड्याविद्र्या चित्रपटांसाठी ३-३ ४-४ तास रांगा लावून बसलेल्या वेड्यावाकड्या जनतेला सांभाळताना आणि शिस्त राखताना घाम फुटला असणार. पण त्यांच्याशिवाय हे सगळं सुरळीत होऊ शकलं नसतं.
मात्र सिनेमॅक्सच्या प्रोजेक्शनिस्टससाठी आणि प्रोजेक्शनिस्टसबरोबर कोऑर्डिनेट करणार्या 'मामि' च्या लोकांसाठी चित्रपट महोत्सवात कसे काम करावे याचे मोठ्ठे वर्कशॉप कुणीतरी तज्ञ लोकांनी घेण्याची प्रचंड जरूर आहे. आलेल्या फिल्म्सची रिळे बरोबर न जोडणे किंवा अजिबातच न जोडणे किंवा खाली डोके वर पाय अशी जोडणे, सबटायटल्सशिवायच स्क्रिनिंग चालू करणे, आस्पेक्ट रेश्यो पार गंडलेला त्यामुळे सबटायटल्स दिसतील किंवा माणसांची डोकी तरी असले प्रकार, गोंधळ झाला काही तर थेट्रातले लोक आरडाओरड करत नाहीत तोवर दुर्लक्ष करणे, गोंधळ निस्तरून मधली ५-१० मिनिटे गायबच करून डायरेक्ट पुढचाच भाग सुरू करणे असले अक्षम्य अपराध प्रत्येकी रोज ४ वेळातरी हे लोक करत होते.
प्रत्येक चित्रपट बघत असताना सुरक्षेला धोका उत्पन्न होईल असं काहीतरी प्रत्येकाकडे निर्माण होतं असा सिक्युरिटीवाल्यांचा समज असावा कारण ४० पायर्या उतरणे आणि परत ४० पायर्या चढणे या परिक्रमेमधे दर वेळेला सगळी पर्स पूर्ण उचकून पाचकून बघितली जात होती. जाम जाम वैताग. अर्थात ते लोक त्यांची ड्यूटी करत होते त्यामुळे त्यांना दोष काय देणार पण निर्णय घेणार्यापुढे माझे कोपरापासून हात जोडलेले
तरीही बघायला मिळालेल्या सिनेमांची शिदोरी इतकी महत्वाची की त्यांचं पारडं जडच...
त्यांच्याबद्दल पुढच्या भागात...
(क्रमशः)
- नीरजा पटवर्धन

0 comments:
Post a Comment