९ ते ११ फेब्रुवारी २०१२ या दरम्यान फ्लेम, पुणे येथील कॅम्पसमधे आंतरराष्ट्रीय थिएटर कॉन्फरन्स झाली. 'नाट्यप्रशिक्षणाचे शास्त्रः भारतीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन(थिएटर पेडगॉजी: इंडियन अॅण्ड इंटरनॅशनल परस्पेक्टीव्ह)' असा या कॉन्फरन्सचा विषय होता.
मी २००१ पासून ललित कला केंद्र - पुणे विद्यापीठ, अॅकेडमी ऑफ थिएटर आर्टस - मुंबई विद्यापीठ, फ्लेम - पुणे, नाट्यदिशा - नेहरू सेन्टर, नॉर्थ लखिमपूर-आसाम येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे एक्स्टेन्शन वर्कशॉप अश्या विविध नाट्यप्रशिक्षण केंद्रांमधे वेशसंकल्पन शिकवत आहे/ शिकवले आहे. तसेच वेशसंकल्पन या विषयातच माझे पदव्युत्तर शिक्षण (एम एफ ए - थिएटर मेजर, कॉश्च्युम डिझाइन फोकस) झालेले आहे. या माझ्या अनुभवावर आधारीत वेशसंकल्पनेच्या शिक्षणासंदर्भात एक पेपर सादर केला होता. माझ्या पेपरचे शीर्षक होते 'टिचिंग कॉश्च्युम डिझाइन..' कॉन्फरन्समधला पेपर असला तरी हा विषय म्हणजे रॉकेट सायन्स नाही आणि पेपरमधले मुद्दे सर्वांच्यासमोर आलेच तर कदाचित हे क्षेत्र समजून घ्यायला मदत होईल या हेतूने खालील लेख लिहित आहे. प्रस्तुत लेख माझ्या पेपरमधील काही भागाचा अनुवाद आहे. काही गोष्टींना मराठी प्रतिशब्द वापरता आले नाहीयेत तर काही ठिकाणी ते तसे वापरणे हे अतिक्लीष्ट तसेच मुद्दा चुकीच्या दिशेला नेत असल्याने वापरले नाहीयेत.
----------
वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझाइनिंग) शिकवताना....
रंगभूमी हे दृकश्राव्य माध्यम आहे जिथे संवाद व संगीत ऐकून तर नटांच्या हालचाली व रंगमंचाची मांडणी बघून प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेत असतो. हा जो बघण्याचा किंवा दृश्य भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कुठल्याही नाटकाचा दृश्य भाग किंवा संरचना कथा व व्यक्तिरेखांना खरेपणा देतो, आधार देतो.
या दृश्य भागाचे एक महत्वाचे अंग म्हणजे वेशसंकल्पन. नाटकाचे मुख्य कार्य जे कथा सांगणे त्यामधे वेशभूषेचा मोठा वाटा आहे. वय, व्यवसाय अश्या ढोबळ गोष्टींपासून स्वभावातल्या बारीक सारीक कंगोर्यांपर्यंत व्यक्तीरेखेच्या अनेक संदर्भांची ओळख प्रेक्षकांना वेशभूषेमुळे होते. प्राचीन काळी म्हणजे जेव्हा नाटक लिहिलेही जात नव्हते तेव्हापासून नटाचे/ नर्तकाचे भूमिकेत जादूई रूपांतर करण्यासाठी वेशभूषेचा उपयोग असेच. नटाचे भूमिकेत रूपांतर करण्यासाठी आजही या कलेची जरूर आहे. हे सर्व असले तरीही रंगभूमीच्या सर्व कलांमधे वेशसंकल्पना ह्या कलेबद्दल अजूनही प्रचंड गैरसमज आहेत आणि अजूनही या कलेला योग्य स्थान दिले जात नाही .
बहुतांशी वेशसंकल्पनेला फॅशन डिझायनिंगचा एक प्रकार मानले जाते. व्यक्तीरेखा व कथेप्रमाणे कपडे, दागिने, इतर अॅक्सेसरीज, डिझाइन करून वेशसंकल्पक एक पूर्ण चित्र निर्माण करतो. एक व्यक्तिरेखा डिझाइन करण्यासाठी व्यक्तिरेखेच्या सखोल अभ्यासाबरोबरच संहितेची शैली, दिग्दर्शकाची ट्रीटमेंट, सादरीकरणाची पद्धत, अभिनयाची पद्धत या सर्व गोष्टींचा अभ्यास वेशसंकल्पकाला करावा लागतो. यासाठी वेशसंकल्पकाला वेगळे शिक्षण घ्यावे लागते जे फॅशनच्या अभ्यासापेक्षा नाट्यशिक्षणाशी जास्त नाते सांगते.
वेशसंकल्पनाचे शिक्षण: पाश्चात्य विचार
पाश्चात्य जगात वेशसंकल्पनाचे शिक्षण हे स्पेशलायझेशन किंवा संपूर्ण नाट्य प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून असे दोन्ही प्रकारे घेता येते. जवळजवळ सर्वच विद्यापीठांच्यात जिथे नाट्य शिक्षण आहे तिथे पदव्युत्तर (ग्रॅड स्कूल/ मास्टर्स - एम एफ ए) स्पेशलायझेशन करता येते. तसेच काही ठिकाणी पदवीही (बॅचलर्स - बी एफ ए) करता येते. या सर्व अभ्यासक्रमांच्या मागे एक विशिष्ट मेथडॉलॉजी आहे.
वेशसंकल्पक बनण्यासाठी संपूर्ण नाट्यकलेचे ज्ञान असणे आवश्यक मानले आहे. यामुळे रंगभूमीचा इतिहास व संहिता विश्लेषण ह्या अतिशय महत्वाच्या विषयांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव असतो. रंगभूमीच्या इतिहासाचा अभ्यास करताना जगभरातल्या रंगभूमीवर प्रचलित असलेल्या सादरीकरणाच्या पद्धती, त्यांची उत्पत्ती, वेळोवेळी केले गेलेले प्रयोग यांची ओळख होते तर संहिता विश्लेषण शिकताना विविध शैलींमधे लिहिलेली नाटके अभ्यासली जातात, अनेकविध दृष्टीकोनांच्यातून तपासली जातात. साहित्यिक प्रवाहांचाही अभ्यास यामधे केला जातो.
याबरोबरच वेशसंकल्पनेची सैद्धांतिक मूलतत्वे आणि प्रात्यक्षिक असे दोन्ही प्रकारचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी वर्गामधले छोटे प्रोजेक्टस तसेच पूर्ण नाटकाच्या प्रत्यक्ष सादरीकरणासाठीही वेशसंकल्पन करणे आवश्यक असते. या प्रक्रियेच्या दरम्यान दिग्दर्शक व वेशसंकल्पक एकमेकांबरोबर काम कसे करतात याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळते. सेमिनार क्लाससाठी विद्यार्थी महत्वाचे विविध वेशसंकल्पक आणि त्यांचे कलेसाठीचे योगदान याच्याबद्दल अभ्यास, संशोधन करून समजून घेतात. एखाद्या क्लास प्रोजेक्टसाठी किंवा प्रयोगासाठी वेशसंकल्पन करताना विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना कागदावर दृश्यस्वरूपात आणणे अपेक्षित असते. यासाठी चित्रकलेच्या शिक्षणाचीही गरज असते. वेशसंकल्पनासाठी उपयोगी अश्या स्केचिंग, जलरंग, कोलाज अश्या विविध तंत्रांचे शिक्षणही दिले जाते. मोठ्या मोठ्या नाटक कंपन्यांची कॉश्च्युम शॉप्स अथवा ज्येष्ठ वेशसंकल्पकाच्या हाताखाली इंटर्नशिप करून व्यावसायिक जगातील कामाच्या पद्धतीचा अनुभव घेणे हे सुद्धा या शिक्षणात अनिवार्य असते.
यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे वेशभूषेचा इतिहास. यामधे कपड्याच्या इतिहासाबरोबरच कला, सजावट व वास्तुकलेचा इतिहासही अभ्यासला जातो. तसेच कला इतिहास आणि सामाजिक व राजकीय इतिहासाचा परस्परसंबंधाबद्दलही तपशीलात जाऊन विचार केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्कृती आणि समाजाच्या जडणघडणीच्या संदर्भाने एक व्यापक दृष्टीकोन मिळतो जो एखादी व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी अत्यावश्यक असतो.
वेशसंकल्पन करताना इतर बाकीच्या संकल्पनाबद्दलही म्हणजे नेपथ्य व प्रकाशयोजना यांबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान असायला हवे कारण या दोन्ही विभागांच्याबरोबरच काम केले जाते. त्यामुळे नेपथ्य व प्रकाशयोजना या दोन्ही कलांबद्दल शिकणे अनिवार्य असते.
वेशसंकल्पकाला कापड, कपडा बेतणे, शिवणे, आल्टरेशन्स या सर्व गोष्टी उत्तमपणे येणे अत्यंत जरूरीचे असते. त्यामुळे वेशभूषा तयार करण्याचे शास्त्र हा अभ्यासक्रमाचा अतिशय महत्वाचा भाग असतो.
उत्तर अमेरिकेतील बहुतेक सर्व विद्यापिठांच्या नाट्यविभागामधे वेशसंकल्पनामधे मास्टर्स करणार्या विद्यार्थ्यांना 'शॉप असिस्टंटशिप' मिळते. ज्यायोगे शिक्षणाच्या आर्थिक बाजू सांभाळली जाण्याबरोबरच विद्यापिठाच्या कॉश्च्युम शॉपमधे काम करण्याचा अनुभवही मिळतो.
वेशसंकल्पनाचे शिक्षण: भारतीय वस्तुस्थिती
वेशसंकल्पनाच्या शिक्षणासंदर्भात भारतातील परिस्थिती अभ्यासल्यास काही ठळक महत्वाचे मुद्दे दिसून येतात.
भारतात केवळ वेशसंकल्पनाचे शिक्षण देणारी एकही संस्था नाही. केवळ राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली येथील तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदविके अंतर्गत 'नाट्य तंत्रज्ञान व संरचना' या विषयामधे दुसर्या व तिसर्या वर्षात स्पेशलायझेशन करता येते. इथेही केवळ वेशसंकल्पन नाही.
बर्याचश्या नाटक शिकवणार्या संस्थांमधे वा विद्यापिठातील विभागांमधे सेट शॉप, कॉश्च्युम शॉप तर दूरच स्वत:चे नाट्यगृह/ सादरीकरणाची जागाही असतेच असे नाही.
काही फॅशन डिझायनिंग शिकवणार्या संस्थांमधे वेशसंकल्पन हा विषय थोडक्यात शिकवला जातो. तिथल्या शिक्षणामधे तारेतारकांचे ग्लॅमरस स्टायलिंग जास्त करून शिकवले जाते. वेशभूषेचा इतिहास या विषयाचा अंतर्भाव फॅशन डिझायनिंगच्या शिक्षणात नक्कीच असतो पण नाट्यशिक्षण वा चित्रपटनिर्मिती यासंदर्भात अर्थातच काहीही शिकवले जात नाही.
इथले पदव्युत्तर नाट्यशिक्षण हे संपूर्ण नाट्यकलेविषयी(कॉम्प्रिहेन्सिव्ह) शिक्षण देणारे असते. असे असले तरीही अभ्यासक्रमात अभिनयशिक्षणावर सगळ्यात जास्त भर असतो. काही शिक्षणसंस्थांच्या मते वेशसंकल्पन वा इतर तंत्राधारीत गोष्टींना अभ्यासक्रमात तोंडओळखीच्या पलिकडे स्थान देण्याची गरज नाही कारण येणार्या विद्यार्थ्यांचा ओढा अभिनय वा दिग्दर्शनाकडेच असतो.

वेशसंकल्पनाची सैद्धांतिक बाजू शिकवण्यासाठी ठेवलेला वेळ जरूरीपेक्षा
अतिशय कमी ठेवलेला असतो. या थोडक्या वेळात जे शिकवले जाईल त्याचे
प्रात्यक्षिक करून बघण्याची संधी क्वचित उपलब्ध होते कारण मुळात
नाट्यशिक्षणासाठी गरजेचे असलेले इन्फ्रास्ट्रक्चरच अस्तित्वात नसते. याच
प्रकारे गुणांकन व्यवस्थेमधेही सैद्धांतिक व प्रात्यक्षिक विभागात
वेशसंकल्पना या विषयाचा अंतर्भाव असतोच असे नाही.
मी जॉर्जिया विद्यापिठात शिकत असताना एक भारतीय म्हणून मला स्वतःची एक
महत्वाची कमतरता जाणवली, ती म्हणजे दृश्य संवेदना आणि दृश्यात्मक विचाराचा
अभाव. हाच अभाव आज मला माझ्या बहुतांश विद्यार्थ्यांच्यातही दिसून येतो.
दृश्यकलांचा अतिशय श्रीमंत वारसा लाभूनही भारतीय विद्यार्थ्यांच्या
नाट्यकलेसाठी पोषक अश्या दृश्य जाणिवा पुरेश्या विकसित नसतात. आपल्या शालेय
शिक्षणात दृश्यकलांचा अतिशय माफक वापर असतो. दृश्यात्मकता हे
शिकण्या-शिकवण्याचे साधन म्हणून क्वचित वापरले जाते. समकालीन दृश्य कलांचे
जग हे नेहमीच एक समांतर जग असते आणि माणूस म्हणून घडण्याच्या प्रक्रियेत
त्याचा काहीच सहभाग नसतो. अर्थातच दृश्यकलांसंदर्भाने विचार व जाणिवा
अविकसितच रहातात. बहुतेक नाट्यप्रशिक्षणसंस्थांना दृश्यकलांचा प्रयोगकलांशी संबंध
आहे आणि त्यांचा अंतर्भाव शिक्षणात केला पाहिजे असे वाटत नाही. हे सगळे
मुद्दे या 'गोष्ट सांगण्याच्या कलेच्या' दृश्य भागाबद्दल शिकणे अवघड करून
ठेवतात. यामुळेच बहुतेक रंगमंच संरचनेला नाट्यप्रशिक्षणामधे फारसे महत्व
दिले जात नाही.
भारतीय वस्तुस्थिती आणि प्रस्तावित शिक्षण पद्धती
विविध नाट्यप्रशिक्षण संस्थांमधे जवळजवळ अठरा वर्षे मी वेशसंकल्पन शिकवत आहे. येथील वस्तुस्थिती लक्षात घेता पाश्चात्य जगात ज्या प्रकारे शिकवले जाते तो अभ्यासक्रम तसाच्या तसा इथे शिकवता येणे शक्य नाही हे उघड आहे. भारतीय प्रशिक्षण संस्थांमधे संपूर्ण नाट्यकलेचा अभ्यासक्रम शिकवला जातो हे लक्षात घेऊन मी वेशसंकल्पनेच्या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या मॉड्युल्सचा प्रयोग करत आलेली आहे.
अ. वेशसंकल्पनेची प्राथमिक तत्वे - यामधे वेशसंकल्पनेचे प्रयोगातील स्थान व महत्व अधोरेखित होईल अशी काही मॉड्युल्स मी वापरते.
१. वेशभूषेचा मानसशास्त्रीय परिणाम - विद्यार्थी एका व्यक्तीचे कपडे, राहणी, अॅक्सेसरीज या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतात व त्या व्यक्तीबद्दल आडाखे बांधण्याचा प्रयत्न करतात. रोजच्या आयुष्यातले कपडे, वस्तू व्यक्तीमत्वावर आणि व्यक्तिमत्व या वस्तूंवर कसा परिणाम करत असते यावर चर्चा होते. चपखल निरीक्षण आणि बारकावे/ तपशील यांना यामधे महत्व दिले जाते.
२. तुलनात्मक अभ्यास - यामचे फॅशन डिझायनिंग आणि कॉश्च्युम डिझायनिंग या दोन शास्त्रांची साम्यस्थळे व फरक याबद्दल चर्चा केली जाते. वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझायनिंग) हा फॅशन डिझायनिंगच्या कलेचा एक भाग नाही ह्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जाते. उत्तम प्रकारचे कापडचोपड, अत्युत्तम कारागिरी वापरून बनवलेले कुत्यूर/ कुटूर आणि इमिटेशन, उच्च दर्जा व किमतीचा भास निर्माण करणार्या वस्तू वापरून बनवलेले कॉश्च्युम यातला फरक स्पष्ट केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या कॉश्च्युममधे फेविकॉल आणि रंग यांच्या पेस्टने चित्र काढून उत्तम भरतकामाच्या नमुन्याचा आभास निर्माण करता येऊ शकतो.
३. वेशभूषेचे रसग्रहण - विद्यार्थी एखादे नाटक एकत्र बघून त्यातील वेशभूषेचे सखोल विश्लेषण करतात.
ब. वेशसंकल्पनाची प्रक्रिया - बहुतांश विद्यार्थी हे अभिनय वा दिग्दर्शनातच रस असलेले असतात. त्यामुळे संहिता ते प्रयोग या प्रवासातली वेशसंकल्पनेची प्रक्रिया अभ्यासताना, अभिनेता किंवा दिग्दर्शकाच्या संदर्भाने ही प्रक्रिया समजावून सांगितली जाते. अभिनेत्याचे वा दिग्दर्शकाचे या प्रक्रियेतील योगदान आणि भूमिका तसेच अभिनेता व वेशसंकल्पक आणि दिग्दर्शक व वेशसंकल्पक या दोन्ही नात्यांबद्दल सविस्तर चर्चा केली जाते.
१. शब्दशः कोणतेही नाटक हे दिग्दर्शकाचे 'व्हिजन' असते असे म्हणता येईल. दृश्य भागासंदर्भाने, प्रेक्षकांना कश्या प्रकारचा अनुभव द्यायचा आहे याची स्पष्ट कल्पना दिग्दर्शकाच्या मनात असायला हवी आणि ती कल्पना तीनही डिझायनर्सना उत्तम प्रकारे समजावून देता यायला हवी.
२. अभिनेत्याने वेशभूषेची संकल्पना समजून घ्यायला हवी. वेशसंकल्पकाच्या अभ्यासाचा आदर करायला हवा. मला हे आवडत नाही ते आवडत नाही असता कामा नये. तसेच तालमींच्या वेळेस वेशभूषेचा सराव व्हावा म्हणून घालायचे कपडे, वेशभूषा व नटांच्या हालचाली या सर्व गोष्टींची चर्चा दोघांमधे व्हायला हवी.
क. दृश्य जाणिवा - हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तसेच आधी सांगितल्याप्रमाणे याबाबतीत काही प्रमाणात विशेष काम करण्याची गरजही आहे. विद्यार्थ्यांनी दृश्यात्मक विचार करावा, त्यांच्या डोळ्यांवर संस्कार व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चित्रांची/ शिल्पांची प्रदर्शने, वेगवेगळ्या पुस्तकांच्यातले चित्र वा शिल्पांचे फोटो, आंतरजालावर उपलब्ध असलेली चित्रे बघावीत हा माझा प्रयत्न असतो.
१. दृश्य संवाद - संरचनेचे घटक व मूलतत्वे, घटकांचे मानसशास्त्रीय परिणाम यांचा तपशिलात अभ्यास.
२. नाटकाच्या संहितेची शैली, सादरीकरणाची शैली आणि नाटकाचे दृश्य संकल्पन यांच्यातले नाते याचा मुळातून व सविस्तर विचार.
वरील दोन्ही गोष्टी समजायला मदत व्हावी म्हणून या चर्चेदरम्यान भरपूर वेगवेगळी दृश्ये, मोठ्या मोठ्या चित्रकारांची चित्रे, महत्वाच्या नाट्यप्रयोगांचे फोटोग्राफ्स असे बरेच काही दाखवून त्यावरही चर्चा केली जाते.
अतिशय कमी तासिकांची उपलब्धता आणि प्रात्यक्षिकाचा अभाव यामुळे ही याही मॉड्यूल्स तशी मर्यादित स्वरूपातच यशस्वी होतात.
भारतीय वस्तुस्थिती: आता यापुढे...
भारतीय नाट्यप्रशिक्षण संस्था व विद्यापीठीय नाट्यविभागांमधे काही मूलभूत बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक महत्वाच्या प्रशिक्षण संस्थेकडे स्वतःचे नाट्यगृह आणि स्वतःची कॉश्च्युम, सेट, प्रॉपर्टी, लाइट वर्कशॉप्स असणे गरजेचे आहे. यासाठी प्रचंड आर्थिक पाठबळाची गरज पडणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाने नाट्यविभागाचा भाषा किंवा अश्या विषयांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणे अत्यंत जरूरीचे आहे. नाट्यविभागाच्या गरजा वेगळ्या आहेत हे समजून घेणे अनिवार्य आहे.
योग्य प्रकारे पायाभूत सुविधा उभारल्या जाव्यात यासाठी नाट्यप्रशिक्षण संस्था वा नाट्यविभागांचा डिझायनिंग किंवा दृश्य संकल्पन या गोष्टींबद्दलचा दृष्टीकोन बदलणे नितांत गरजेचे आहे. कोरी पाटी घेऊन येणार्या विद्यार्थ्याला अभिनय वा दिग्दर्शन यातच रस असणे हे साहजिक आहे कारण आपल्याकडे नाटकाच्या तांत्रिक वा दृष्यसंकल्पनाच्या अंगांबद्दल सामान्य माणसांना फारसे माहित नसते, त्यासंदर्भाने तेवढी जागरूकता नसते. पण हे अज्ञान आहे हे कारण अभ्यासक्रम आखतानाचा पाया असता कामा नये. एकत्रित किंवा संपूर्ण नाट्याभ्यासक्रमात सर्व बाजूंना योग्य ते स्थान दिले गेले पाहिजे. दृश्य भाग हा पैशाअभावी काट मारण्याचा 'जास्तीचा' भाग नव्हे हे प्रशिक्षण संस्थांनी वा विद्यापिठांतील नाट्यविभागांनी लक्षात ठेवायला हवे. याचबरोबर दृश्यसंकल्पनाचे विषय शिकवण्यासाठी ठेवला जाणारा वेळ पण वाढवायला हवा जेणेकरून विद्यार्थ्यांना विषयाची किमान तोंडओळख तरी व्यवस्थित होऊ शकेल.
गुणांकन पद्धतीमधेही या अनुषंगाने बदल व्हायला हवेत. विद्यार्थ्यांना मूल्यमापनात शिकलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक करून बघायची संधी मिळायला हवी. संपूर्ण नाट्यप्रशिक्षणाच्या काळात किमान एका तरी प्रॉडक्शनमधे विद्यार्थ्याने वेशभूषा विभागात काम करणे अनिवार्य ठेवायला हवे.
प्रशिक्षण संपल्यावर विद्यार्थी याच क्षेत्रात उतरणार असतात त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात काम कश्या प्रकारे चालते याचा अंदाज येण्यासाठी प्रशिक्षणाचा भाग म्हणून व्यावसायिक व्यक्तीच्या हाताखाली काम करणे अनिवार्य असायला हवे. जेणेकरून या क्षेत्राशी प्रत्यक्ष ओळख तर होतेच पण संपर्क वाढल्याने बाहेर पडल्यावर काम मिळण्याच्या दृष्टीनेही मदत होऊ शकते.
सर्वात शेवटी अतिशय मह्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय पारंपरिक रंगभूमीची ओळख व नाळ जोडली जाणे. भारताची पारंपरिक रंगभूमी ही विधिनाट्य ते लोकधर्मी आणि नाट्यधर्मी अश्या सर्व प्रकारच्या अनेक शैलींचा समावेश असलेली श्रीमंत रंगभूमी आहे. प्रत्येक पारंपरिक रंगभूमी वैशिष्ठ्यपूर्ण दृश्य संकेतांचे पालन करते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातही हे उल्लेख आहेत. अभिनय प्रकारापैकी 'आहार्य अभिनय' ह्या संकल्पनेत रंगमंच, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यांचा विस्तृत स्वरूपात विचार केलेला आहे. बहुतेक नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमात पारंपरिक रंगभूमीचा आढावा घेतला जातो. पण तो आढावा शारीरीक हालचालींची पद्धत, वारंवार दिसून येणारे विषय, संगीताचा प्रकार यासंदर्भात जास्त करून असतो. वेशभूषेचे वर्णन केलेले असते पण ते वस्तूंची यादी, त्या शरीरावर कुठे घातल्या जातात इतपतच असते. ठराविक वेशभूषा असण्याच्या मागचा संरचनात्मक विचार आणि त्याचा भारतीय दृश्य कलांशी घातलेला मेळ याबद्दल काहीच मिळत नाही. ह्या विषयाची किमान तोंडओळख होण्याइतपत तरी चर्चा केली जायला हवी. अर्थात या विषयामधे खूप मर्यादित स्वरूपात संशोधन उपलब्ध आहे. भारतीय रंगभूमीच्या इतिहासाच्या या पैलूबद्दल खोलात जाऊन केलेल्या संशोधनाची, संदर्भांची इथे नितांत आवश्यकता आहे.
समारोप
वेशसंकल्पन किंवा रंगभूमीच्या कुठल्याही पैलूचे व्यावसायिक शिक्षण देणार्या अभ्यासक्रमात त्या त्या विषयाचे संपूर्ण सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक ज्ञान या दोन्हीचा समावेश असायला हवा. अश्या प्रकारच्या प्रशिक्षणातून तयार झालेला विद्यार्थी बाहेर पडल्यावर आपल्या क्षेत्रात अर्थातच उत्तम कामगिरी करेल. त्याच्यामुळे त्याच्यासारख्या इतर अनेकांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवली जाईल. त्यामुळे अनेकांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करण्याची प्रेरणा मिळेल. यामुळे प्रशिक्षण संस्थांकडे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी जमा होणे हे पण सोपे होईल.
सध्यातरी ऐकायला स्वप्नवत वाटतेय.. नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमातील दृश्यसंकल्पन या विषयाची पुनर्बांधणी केल्यावरच हे सर्व स्वप्न की वास्तव हे खरोखर समजू शकेल.
-----------------------------------------------------------------------------
संदर्भसूची
पुस्तके:
द मॅजिक गार्मेंट - रिबेका कनिंगहॅम
कॉश्च्युम डिझाइनः टेक्निक्स ऑफ मॉडर्न मास्टर्स - लिन पेक्टेल
संकेतस्थळे:
डिपार्टमेंट ऑफ थिएटर अॅण्ड फिल्म स्टडीज; युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया
स्कूल ऑफ थिएटर; कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ आर्टस
स्कूल ऑफ ड्रामा; कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटी
टिश स्कूल ऑफ आर्ट; न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी
स्कूल ऑफ थिएटर, फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन; यूसिएलए
रॉयल अॅकेडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस
1 comments:
First of all- background of blog is amazing..
It's little bit techo subject but sounds interesting
Post a Comment