Saturday, June 24, 2017

ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट!

एक होती ठकू. स्वैपाकाच्या बाबतीत महानाठाळ. आईने स्वैपाक शिकवायचा प्रयत्न केला, पण ठकूने कधी दाद दिली नाही. कॉलेजबरोबर हजारो उद्योग असत, त्यामुळे ठकू घरी कमीच असे. मुळात स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच ठकूला फारशी पसंत नव्हती. वरण-भात आणि भरपूर दूधसाखरवाली उकळी कॉफी हे दोनच पदार्थ होते, जे ठकूला कुणाच्याही मदतीशिवाय सुरुवातीपासून शेवटापर्यंत जमत असत. पोहे आणि साबुदाण्याची खिचडी...

Tuesday, June 13, 2017

पावसाच्या गोष्टी - २

वर्गामधे गणवेश न घालता बसणे यात कसली भारी गंमत आहे. पावसातच ते शक्य आहे. एरवी शाळेत जाणं म्हणजे वाटेत इतक्या मैत्रिणींची घरं. आपली त्यांची वेळ जुळली तर आपण तिथून जात असताना त्या भेटणार. मग गप्पा मारत मारत, तुळशीबागेच्या गल्लीतले मांडलेले खजिने बघत बघत शाळेत पोचायचं यात केवढी मज्जा आहे. आख्ख्या दिवसातली धमाल त्या गप्पांच्यात आहे. पण पावसामधे शाळेत जाणं हा वैताग असतो. पावसाळ्यात खांद्यावर दप्तर आणि...

Saturday, June 10, 2017

पावसाच्या गोष्टी - १

जरा तपेलीभर पाऊस पडला की भक्क असा आवाज येऊन दिवे जात. प्रमोदबनमधे राहणारी काही मंडळी आपापल्या गॅलर्‍यांमधे रस्त्यावरून येणारे जाणारे लोक बघत. घरामधे मेणबत्त्या, गॅसच्या बत्त्या वगैरे. समोर डावीकडे कामवाल्यांची वस्ती. तिथली सगळी पोरंटोरं वस्तीच्या बाहेर येऊन पारेकर टेलरच्या दुकानाच्या बाहेरच्या फळीवर. पारेकरचं दुकान वस्तीत नाही. वस्तीला लागून असलेल्या दुमजली चाळीत. चाळीत ज्यांची घरे रस्त्याकडे तोंड...

Wednesday, June 7, 2017

हॉरर वगैरे!

त्यादिवशीची मधली सुट्टी फार म्हणजे फारच बेकार होती. त्याच दिवशी माझ्यावर निर्लज्ज असण्याचा पहिला शिक्का बसला. अतिशय प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यात पाण्याचा टिपूसही येत नव्हता आणि शेजारच्या बाकावरची मुलगी हमसून हमसून रडत होती. तिच्याभोवती सांत्वनकरूंचा गराडा पडलेला होता. मला कणभर रडू येत नसल्याने सर्व सांत्वनकरू माझ्याकडे दुष्ट खलनायिकेकडे तुच्छतेने बघावे तश्या बघत होत्या. मला जाम राग येत होता....

Thursday, June 1, 2017

तिची डायरी

"मला बोलावणेच नाहीये तिथे मी का येऊ?"  "माझ्याबरोबर म्हणून ये ना." "कॉश्च्युम शॉपच्या कुणालाही नाहीये बोलावणे. शॉप हेड आणि कॉश्च्युम डिरेक्टर त्यांनाही नाही. आणि मी कशी जाऊ?" "माझी प्लस वन म्हणून."  "छे!""का काय हरकत आहे?""आपण एकाच कंपनीत काम करतो पण तू स्टार वगैरे आहेस किंवा होऊ घातला आहेस. तिशीही गाठलेली नसताना प्रिन्सिपल सिंगर झालायस. आणि मी कॉश्च्युम शॉपमधली कामगार.""त्याने काय फरक...

Search This Blog