"हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या...
Tuesday, March 30, 2021
Monday, March 1, 2021
प्रवास
मराठी शाळेत असल्यामुळे आमच्या शाळेच्या सहली असत. एका दिवसाच्या सहली. कुठेतरी जाऊन काहीतरी बघायचं. दिलेले सगळे डबे संपवायचे हा मुख्य कार्यक्रम असे. डब्याचा मेन्यू दरवर्षी ठरलेला होता. सकाळी खायला (नाश्ता आणि ब्रेकफास्ट हे शब्द तेव्हा रुळले नव्हते आमच्या जगात) चटणी आणि जाम सँडविचेस असायची. अश्विनी आणि माझी एकत्र असायची सँडविचेस. तिच्याकडे सगळी जॅमची आणि माझी सगळी चटणीची किंवा उलट. खायच्या वेळेला अर्ध्यांची...
मराठी भाषा दिन
भ्रमणध्वनीवरून चेहरेपुस्तकावर मराठीत टपाल लिहून आजचा मराठी भाषा दिनाचा सोहळा करायचा आहे. त्यानिमित्ताने काही मराठी वाक्ये. अश्या स्वरूपाच्या वाक्यांचा आपल्या वाचेत विनियोग केला की मराठीचे सुवर्णयुग साकारलेच म्हणून समजा. १. स्वयंचलित दुचाकी लत्ताप्रहाराने कार्यान्वित करण्याऐवजी हातदंडावर असलेली कळ दाबून कार्यान्वित करण्याचे नवीन तंत्रज्ञान आताशा उपयोजिले जाते.२. पद्धत जामानिम्यात अलंकारांबरोबरच...
वास
संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला निमशहरी किंवा ग्रामीण भागात रस्त्यांवर एक विशिष्ट वास असतो. बटाट्याचा खीस घालावा त्या जातकुळीचा वास असतो तो. कशाचा नक्की ते माहीत नाही पण असतो. एवढे वर्षांच्या सगळ्या फिरफिरीत तो वास, आजूबाजूचे मावळत जाणारे वातावरण, दिवसाचे काम संपवून राहण्याच्या ठिकाणी परत जायचा प्रवास, लोक घरी जातायत आणि आपण हॉटेलवर जातोय - आपण इथले नाही हे अधोरेखित होणे, हा वास येतो...
Subscribe to:
Posts (Atom)