भ्रमणध्वनीवरून चेहरेपुस्तकावर मराठीत टपाल लिहून आजचा मराठी भाषा दिनाचा सोहळा करायचा आहे. त्यानिमित्ताने काही मराठी वाक्ये. अश्या स्वरूपाच्या वाक्यांचा आपल्या वाचेत विनियोग केला की मराठीचे सुवर्णयुग साकारलेच म्हणून समजा.
१. स्वयंचलित दुचाकी लत्ताप्रहाराने कार्यान्वित करण्याऐवजी हातदंडावर असलेली कळ दाबून कार्यान्वित करण्याचे नवीन तंत्रज्ञान आताशा उपयोजिले जाते.
२. पद्धत जामानिम्यात अलंकारांबरोबरच शिरोवस्त्रे व शिरोभूषणे, पट्टे, कालगणक डबी, चक्षुसुख भिंगे, झोळ्या, बटवे आणि पादत्राणे यांचा समावेश असतो.
3. कलाकुसरसामान विकणाऱ्या दुकानात विनाआम्ल कागद, पाणीरंग, कृत्रिमरंग, तेलरंग, कडककापडफलक, कुंचले, झरलेखण्या, शिसलेखण्या, चिकटघोळ, चिकटपट्ट्या, चिकट्याची बंदूक, मणी, दोरे, सुया, लोकर, उष्णतावरोधक सफेद व रंगीत पुठ्ठे आणि इतर अनेक वस्तू मिळतात.
तसेच वस्तूंना व कृतींना मराठी प्रतिशब्द मिळेपर्यंत त्यांना विचारात अथवा विनियोगात घ्यायचे नाही अशी आज या मराठी भाषा दिनी आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत.
- नी
#प्रतिशब्द_आतंकवाद #मराठीभाषादिन_नव्हे_दीन #प्रतिशब्दसंस्कृतप्रचुरचहवा
गरजूंसाठी(असे लोक आहेत) सूचना: प्रत्येक शब्दाला ओढूनताणून मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या वा तयार करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या मराठीवाचव्या जनांच्या फुकाच्या अट्टाहासासंदर्भाने उपहासात्मक विनोद म्हणून ही पोस्ट लिहिलेली आहे.
मराठीच्या आग्रहाबद्दल माझे तारतम्य शाबूत आहे. त्याबद्दल शंका घेऊ नये आणि मला लेक्चर मारू नये. धन्यवाद!
0 comments:
Post a Comment