Tuesday, November 11, 2008

स्वच्छतेच्या बैलाला..!!

मायबोलीच्या दिवाळी अंकात माझा 'स्वच्छतेच्या बैलाला..!!' हा लेख प्रसिद्ध झाला. ------------------------------------------------------------------- "इथे लेडीज टॉयलेटची सोय कुठेय?" प्रॉडक्शन मॅनेजर जयंतला मी विचारलं. एका आडगावात शूट होतं. संपूर्ण दिवस आम्ही त्या एकाच जागी शूट करणार होतो. अश्या वेळी पर्याय नसल्यामुळे हे विचारण्याचा निर्लज्जपणा मी अंगी बाणवून घेतला होता. अत्यंत त्रासिक चेहर्‍यापासून...

Saturday, November 8, 2008

व्हॉट काइंड ऑफ आयडीया दुबेजी इज....

कालची मेजवानी....द दुबे शोस्थळ - पृथ्वी थिएटर, जुहूसादरकर्ते/ सूत्रधार - सुनील शानबाग आणि आकाश खुराना.दुबेजींच्या कारकिर्दीचा लेखाजोखा. त्यांच्या अभिनेत्यांनी त्यांच्याबद्दल मांडलेले विचार. जुनी क्लिपिंग्ज. दुबे आणि वर्कशॉप्स आणि त्यातले excercises. all the things that hee keeps saying and he has said before... important, eccentric.. all of it. A real tribute to Dubeyji...त्यांच्या सगळ्या स्टुडण्टस...

Sunday, November 2, 2008

दिवाळीचं लिखाण...

ऑनलाइन दिवाळी अंकाची प्रथा चालू करण्याचं श्रेय www.maayboli.com या संकेतस्थळाला जातं. मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंकाचं हे यंदाचं ९वे वर्ष. हा दिवाळी अंक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2008/त्यात या ठिकाणी माझा लेख आहे. जरूर वाचा.http://vishesh.maayboli.com/node/26झुंजुमुंजु नावाचा एक दिवाळी अंक आहे. ज्यावर राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र मुखपृष्ठावर...

Sunday, September 28, 2008

प्रिय मित्रा!!

क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या 'प्रिय' या कवितेतल्या तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळेमी कधी फुशारुन गेले नाहीया पहिल्या दोन ओळी चोरून पुढे....-----------------------------------------तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळेमी कधी फुशारुन गेले नाहीमी मोहरले नक्कीचहे तात्कालिकच आहे अशी समजूत घातली स्वतःची तगमग शांतवण्यासाठी'का होईना! ओढ तर आहे'अशीही समजूत घातली मनाचीसुखवून जाण्यासाठी..या तात्कालिक...

Saturday, September 20, 2008

सूर्यास्त

गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो.कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात ना...

Friday, September 19, 2008

ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी

"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने. लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर."तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका"आमचं आडनाव लावत नाहीस...

Tuesday, May 6, 2008

पोर्ट्रेट - मेराल्डिना

गेल्या आठवड्यात पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे 'मी एक माझे दोन' हे कॉमेदिया देलार्त पठडीचे नाटक सादर झाले. कपडे अर्थातच मी डिझाइन केले होते. त्यातल्या एका व्यक्तिरेखेचे हे रंगमंचाच्या मागे काढलेले छायाचित्र.कॅमेरा निकॉन कूलपिक्स एल १५, ८ मेगापिक्सल. ऑटो फोकस विथ ३ एक्स ऑप्टिकल झूम.सेटिंग - सीन:पोर्ट्रेट.फ्लॅश...

Thursday, April 3, 2008

मोगरा, पावसाचा वास आणि बीएमडब्ल्यू!!

"खरं सांगतो, त्या गाडीची टेस्ट राइड घेतली तेव्हा मनापासून वाटलं की काय करतोय आपण हे सगळं? कला बिला सब झूठ आहे गं. आपण पण आता पैसा कमावला पाहिजे."मित्र भारावून सांगत होता. आम्ही गारूड्याच्या पुंगीवर डोलावं तसं त्या बीएमडब्ल्यू स्पोर्टसकारचं वर्णन ऐकत होतो."असा तो सिल्व्हर कलर. आतमधे थोड्या डार्क सीटस त्याही लेदरच्या. नव्या कोर्‍या लेदरचा तो वास! म्हणजे मोगर्‍याचा आणि पहिल्या पावसाचा वास सोडून इतका...

Monday, January 28, 2008

वळू

ऑक्टोबर मधे प्रीव्ह्यू पाह्यला होता.चित्रपट मला अजिबात आवडला नाही. गोष्ट म्हणायची तर गावात देवाला सोडलेला वळू असतो तो हिंसक होतो. त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसरला त्या वळूला पकडायला बोलावतात. त्या ऑफिसरबरोबर त्याचा अतिउत्साही Docu-maker भाऊही असतो. वळूला पकडायला गावात फारेश्ट चं येणं, सोबत डाक्यूमेंट्रीचं गावात येणं, गावातल्या लोकांनी डुरक्या (वळू) च्या गोष्टी सांगणं यातून गाव आणि व्यक्तिरेखा उलगडत जातात....

Saturday, January 26, 2008

'ते पुढे गेले'

तडजोडी, खटपटी करत जगताना, यशस्वी नाहीतरी किमान 'पुढे' जाताना थांबवून कुणी तुम्हाला नागडं करणारा आरसा दाखवला तर काय होईल? त्यातून तुम्ही स्वतःला संवेदनशील वगैरे म्हणवून घेत असाल, चुक बरोबर चा निवाडा आत कुठेतरी जागा असेल अजून तर काय होईल तुमचं? बास हेच होतं 'ते पुढे गेले' बघताना. माणसाचा सतत पुढे जाण्याचा हव्यास, obsession च खरंतर आपल्याला सगळा विधिनिषेध विसरायला लावतो. कुठलीही किंमत मोजून पुढे जाताना...

Monday, January 7, 2008

गंध कुणाचा...

वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत.नीता, मेट्रोलिंक, खुराणा, फलाणा, धमकाना... अशी या बसेस ची नावे असतात. गाडी पुण्याहून मुंबईस वा मुंबईहून पुण्यास नेतात. शेवटच्या स्टॉपवर शेवटचा माणूस उतरत असतानाच परतीचा पहिला माणूस आत चढून बसतो आणि मग पुढच्या ६ ते ७ तासाMसाठी तो त्या 'भीषॉन शुंदॉर' ला सामोरा जातो. गाडीतली हवा तशीच आतल्याआत फिरत रहाते, कधीच बाहेर...

Search This Blog