एखादा सीन शूट होणार असतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर असतं. रात्रीची निजानीज होण्याची वेळ असते. घरातले सगळेजण साधारण आता उठून लग्नाला जातील अश्या कपड्यांमधे असतात. ते दिग्दर्शकाला सांगायला जावं तर दिग्दर्शक म्हणतो चलता है, फ्रेम चकाचक दिखना चाहीये.
व्यक्तिरेखा पन्नाशीची खडतर आयुष्य काढलेली आणि कंटाळलेली,...
Thursday, December 23, 2010
Wednesday, December 22, 2010
सोंग सजवण्याची कला - ७. इकडचं नाट्य
आधीचे सहा लेख वाचून माझ्या एका प्रश्नाळू मैत्रिणीला प्रश्न पडले. अगदी मूलभूत स्वरूपाचे प्रश्न. तिचे प्रश्न ऐकल्यावर लक्षात आलं की मी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या विसरूनच गेले बहुतेक. तिच्या प्रश्नांच्या अनुषंगानेच या महत्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते आता.
तिचा पहिला प्रश्न की भारतातल्या...
Tuesday, December 21, 2010
सोंग सजवण्याची कला - ६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे.
“मग हे लेख लिहिल्यावर नवीन ऑर्डर मिळाली की नाही?"
"कसली?"
"कपड्यांची? तू फॅशन डिझायनर आहेस ना?"
"मी फॅशन डिझायनर नाहीये रे मी कॉश्च्युम डिझायनर आहे." शक्य तितक्या शांतपणे मी एकाला उत्तर दिले. हे मला नवीन नाही.
"तेच ते गं! तेही कपडेच बनवतात आणि तुम्हीही, काय फरक मग तुमच्यात!" असही एका भोचक मावशींनी...
Thursday, December 16, 2010
सोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास
“तू श्वासचे कॉश्च्युम डिझाइन केलेस म्हणजे तुला नटांनी सांगितले ते कपडे आणून दिलेस की तू ठरवलेस?" एका मुलाखतकाराने भर सभेमधे मला प्रश्न विचारला. मी अवाक. पण श्वाससाठी कॉश्च्युम डिझायनिंग केलंस म्हणजे केलं काय नक्की हा प्रश्न पडलाच असेल अनेकांना. त्याबद्दलच बोलूया.
चित्रपटाचा महत्वाचा घटक असतो दिग्दर्शक....
Wednesday, December 15, 2010
सोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं
यावेळेला खर्याखुर्या नाटकाच्या मी केलेल्या डिझायनिंगबद्दल बोलायचं आपलं ठरलंय गेल्या वेळेलाच तेव्हा नमनाला घडाभर तेल नको ओतायला. जाउया तिकडच्या नाटकांकडे, डिझायनिंगकडे.
यूजीए मधलं पहिलं वर्ष प्रत्यक्ष डिझायनिंग करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारीचं गेलं. पण उन्हाळ्यात सँटा फे ऑपेरा मधे मात्र संधी मिळाली....
Monday, December 13, 2010
सोंग सजवण्याची कला - ३. डिझायनिंग पूर्वी
"काय करता काय तीन वर्ष कॉश्च्यूमच्या शिक्षणामधे?" या प्रश्नाचं उत्तर देताना खूप सार्या विषयांचा पाढा वाचून तर झाला "पण त्या सगळ्याचा उपयोग करायला शिकवलं की नाही तुम्हाला?" असा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात वळवळला असणारच. तेव्हा त्याबद्दलच गप्पा मारू याच पण त्या आधी डिझायनिंगची पूर्वतयारी समजून घेऊया...
Sunday, December 5, 2010
सोंग सजवण्याची कला - २. अमेरिकेतील शिक्षण
"अमेरीकेतला किती महिन्याचा कोर्स होता हा तुझा कॉश्च्युम डिझायनिंगचा?" या प्रश्नावर तीन वर्ष म्हणजे सहा सेमिस्टर्स असं उत्तर दिल्यावर "काय करता काय इतकी वर्ष तुम्ही" असा प्रश्न येतो आपसूक. त्याचं उत्तर द्यायचा हा थोडासा प्रयत्न करतेय आजच्या लेखात.
पुण्याच्या ललित कला केंद्रात नाटकामधे एम. ए. करताना...
Thursday, December 2, 2010
सोंग सजवण्याची कला - १. बजेटच नाही.
जानेवारी २००८ ते मार्च २००८ या कालावधीत प्रहार या वृत्तपत्राच्या रिलॅक्स या दर शनिवारी प्रसिद्ध होणार्या पुरवणीमधे माझ्या व्यवसायासंदर्भाने मी ८ लेखांची मालिका लिहीली होती. त्यावेळेला शक्य न झाल्यामुळे इथे युनिकोड स्वरूपात ते टाकू शकले नव्हते. आता सर्व लेख एकेक करून परत टाकणारे. हा त्यातला पहिला.
----------------------------------------------------------------------------------------------
"आम्ही...
Subscribe to:
Posts (Atom)