एखादा सीन शूट होणार असतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर असतं. रात्रीची निजानीज होण्याची वेळ असते. घरातले सगळेजण साधारण आता उठून लग्नाला जातील अश्या कपड्यांमधे असतात. ते दिग्दर्शकाला सांगायला जावं तर दिग्दर्शक म्हणतो चलता है, फ्रेम चकाचक दिखना चाहीये.
व्यक्तिरेखा पन्नाशीची खडतर आयुष्य काढलेली आणि कंटाळलेली,...
Thursday, December 23, 2010
Wednesday, December 22, 2010
सोंग सजवण्याची कला - ७. इकडचं नाट्य
आधीचे सहा लेख वाचून माझ्या एका प्रश्नाळू मैत्रिणीला प्रश्न पडले. अगदी मूलभूत स्वरूपाचे प्रश्न. तिचे प्रश्न ऐकल्यावर लक्षात आलं की मी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या विसरूनच गेले बहुतेक. तिच्या प्रश्नांच्या अनुषंगानेच या महत्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते आता.
तिचा पहिला प्रश्न की भारतातल्या...
Tuesday, December 21, 2010
सोंग सजवण्याची कला - ६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे.
“मग हे लेख लिहिल्यावर नवीन ऑर्डर मिळाली की नाही?"
"कसली?"
"कपड्यांची? तू फॅशन डिझायनर आहेस ना?"
"मी फॅशन डिझायनर नाहीये रे मी कॉश्च्युम डिझायनर आहे." शक्य तितक्या शांतपणे मी एकाला उत्तर दिले. हे मला नवीन नाही.
"तेच ते गं! तेही कपडेच बनवतात आणि तुम्हीही, काय फरक मग तुमच्यात!" असही एका भोचक मावशींनी...
Thursday, December 16, 2010
सोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास
“तू श्वासचे कॉश्च्युम डिझाइन केलेस म्हणजे तुला नटांनी सांगितले ते कपडे आणून दिलेस की तू ठरवलेस?" एका मुलाखतकाराने भर सभेमधे मला प्रश्न विचारला. मी अवाक. पण श्वाससाठी कॉश्च्युम डिझायनिंग केलंस म्हणजे केलं काय नक्की हा प्रश्न पडलाच असेल अनेकांना. त्याबद्दलच बोलूया.
चित्रपटाचा महत्वाचा घटक असतो दिग्दर्शक....
Wednesday, December 15, 2010
सोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं
यावेळेला खर्याखुर्या नाटकाच्या मी केलेल्या डिझायनिंगबद्दल बोलायचं आपलं ठरलंय गेल्या वेळेलाच तेव्हा नमनाला घडाभर तेल नको ओतायला. जाउया तिकडच्या नाटकांकडे, डिझायनिंगकडे.
यूजीए मधलं पहिलं वर्ष प्रत्यक्ष डिझायनिंग करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारीचं गेलं. पण उन्हाळ्यात सँटा फे ऑपेरा मधे मात्र संधी मिळाली....
Monday, December 13, 2010
सोंग सजवण्याची कला - ३. डिझायनिंग पूर्वी
"काय करता काय तीन वर्ष कॉश्च्यूमच्या शिक्षणामधे?" या प्रश्नाचं उत्तर देताना खूप सार्या विषयांचा पाढा वाचून तर झाला "पण त्या सगळ्याचा उपयोग करायला शिकवलं की नाही तुम्हाला?" असा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात वळवळला असणारच. तेव्हा त्याबद्दलच गप्पा मारू याच पण त्या आधी डिझायनिंगची पूर्वतयारी समजून घेऊया...
Sunday, December 5, 2010
सोंग सजवण्याची कला - २. अमेरिकेतील शिक्षण
"अमेरीकेतला किती महिन्याचा कोर्स होता हा तुझा कॉश्च्युम डिझायनिंगचा?" या प्रश्नावर तीन वर्ष म्हणजे सहा सेमिस्टर्स असं उत्तर दिल्यावर "काय करता काय इतकी वर्ष तुम्ही" असा प्रश्न येतो आपसूक. त्याचं उत्तर द्यायचा हा थोडासा प्रयत्न करतेय आजच्या लेखात.
पुण्याच्या ललित कला केंद्रात नाटकामधे एम. ए. करताना...
Thursday, December 2, 2010
सोंग सजवण्याची कला - १. बजेटच नाही.
जानेवारी २००८ ते मार्च २००८ या कालावधीत प्रहार या वृत्तपत्राच्या रिलॅक्स या दर शनिवारी प्रसिद्ध होणार्या पुरवणीमधे माझ्या व्यवसायासंदर्भाने मी ८ लेखांची मालिका लिहीली होती. त्यावेळेला शक्य न झाल्यामुळे इथे युनिकोड स्वरूपात ते टाकू शकले नव्हते. आता सर्व लेख एकेक करून परत टाकणारे. हा त्यातला पहिला.
----------------------------------------------------------------------------------------------
"आम्ही...
Monday, November 22, 2010
निर्जाबाईंच्या कथा
आपल्याला उगाच वाटत असतं की आपण खूप लिहीलंय पण प्रत्यक्षात ते तेवढं काही नसतं आणि भलं तर त्याहून नसतं. हा नवीन झालेला साक्षात्कार!
आता का आणि कसं म्हणाल तर माझ्या आयुष्यात लिहिलेल्या सगळ्या कथा काही कारणामुळे मी खणून काढल्या आणि काय सांगू महाराजा त्या एकुणात केवळ सहाच निघाल्या.
ब्लॉगवर मी कधी कथा टाकत नाही माझ्या. पण म्हणलं माझा ब्लॉग वाचणार्यांना माझ्या कथा देऊन पिडायला काय हरकत आहे नाही का?
तर...
Monday, November 8, 2010
हितगुज दिवाळी अंक - २०१०
मायबोलीचा (www.maayboli.com) हितगुज दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.
मायबोलीच्या दिवाळी अंकापासून साधारण ११ वर्षापूर्वी ऑनलाइन दिवाळी अंक ही संकल्पना सुरू झाली आणि मग ती अनेकांनी उचलली.
यावर्षीच्या दिवाळी अंकाची खासियत म्हणजे चार ठराविक विषय.
* रंग उमलल्या मनांचे
* निसर्गायण
* कला आणि जाणिवा
* वेगळ्या वाटा,नवी क्षितिजे
या...
Sunday, August 15, 2010
Wednesday, July 28, 2010
कलात्म
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कलाजगताबद्दल एक विशेषांक काढला आहे माइंड अॅण्ड मिडीया या संस्थेने.
एकूण दोन भागात असलेल्या या विषेशांकाचे नाव कलात्म असे आहे. अतिथी संपादक स्वतः डॉ. श्रीराम लागू आहेत. ऐल आणि पैल असे दोन भाग आहेत. एकूण मिळून साधारण ८० लेख आहेत.
रवी परांजपे, डॉ. द भि कुलकर्णी, प्रभा अत्रे, शांता गोखले, सुरेश तळवलकर, मीना कर्णिक, श्यामला वनारसे, शमा...
Thursday, June 3, 2010
कविता होताना!
"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं.
मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे?
खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं...
मग मैत्रिणीने कोडंच घातलं...
"परवापासून...
Sunday, May 16, 2010
ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २
गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला.
कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी या तिघांनी अतिशय उत्तमपणे या मेळाव्याचे संयोजन (आर्थिक बाजूसकट) उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यांचे आभार. या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या ब्लॉगर्सनी...
Wednesday, April 21, 2010
बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती

हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.
आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=63994:2010-04-20-18-24-39&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक...
Wednesday, March 31, 2010
साथ

कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले.
जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे
आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्या आजी, हात पाय सुजलेले
आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा
...
Monday, March 8, 2010
परत ब्लॉगिंगबद्दलच..
मराठी मंडळी नावाचा एक उपक्रम चालू झालाय. छान आहे. लगोलग सदस्यत्व घेतलंय. बाजूला लोगो पण टाकलाय. पण अजून सगळं प्रकरण समजायला वेळ लागणार बहुतेक. माझ्या ब्लॉगवर लिहिल्यावर तिथे माझं नवीन लिखाण दिसू लागेल की तिथे जाऊन वेगळं लिहावं लागेल हे नीटसं कळलेलं नाहीये. अश्या ठिकाणी माझं अ-तांत्रिक असणं जाणवतं.
सध्या मुंबईच्या बाहेर आणि तेही नेट अॅक्सेस नसेल अश्या ठिकाणी फिरणे खूप चालू आहे कामानिमित्ताने....
Monday, February 15, 2010
काळ्या घोड्याचा उरूस!
फेब्रुवारी २०४५'दर वर्षी थंडीच्या मोसमात मुंबईनगरीमधे फोर्ट परिसरात काळ्या घोड्याचा उरूस भरतो. तर्हेतर्हेचे खाद्यपदार्थ, भिरभिरी, मुखवटे, इतर खेळणी, टिशर्ट, कपडे, दागिने, मातीच्या उपयोगी वस्तू याची भरपूर रेलचेल असते. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. विशेषतः शनिवार रविवारच्या दिवशी तर मुंगीला शिरायला जागा उरत नाही एवढी गर्दी होते. काळा घोडा ही देवता तांत्रिक...
Subscribe to:
Posts (Atom)