Saturday, May 23, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - ५. आपलं काय काय म्हणायचं?

“ती हिंदी सिनेमातल्या दुखियारी माँ सारखे कपडे घातलेली रोमन बाई कोण गं ठकू? तिने साडीचा शोध लावलाय. हो ना?” गुगल संशोधकांनी ठकूला विचारले. “साडी म्हणजे काय वीज आहे का शोध लावायला?” ठकूने नाक उडवले.प्राचीन रोमन काळातली दुखियारी माँ अंगावर घातलेल्या झग्यावरून आडवातिडवा लांबरुंद ‘पल्ला’ लपेटून घ्यायची....

कापडाचोपडाच्या गोष्टी - ४. झाकपाक

“हल्लीच्या मुलींना फार झाकपाक करायला हवी. माझ्या खापर खापर पणजीच्या काळात नुसते उत्तरीय वापरायचे. आम्ही जेमतेम स्तनपट्टे वापरले. आता मुलींना चोळ्या हव्यात. नखरे नुसते!” मौर्य काळाच्या अखेरच्या पर्वात तरुण असलेली एक पणजीबाई तिच्या गुप्त काळातल्या खापर खापर नाती, पणत्यांबद्दल वैतागत होती.पार वैदिक काळात...

कापडाचोपडाच्या गोष्टी - ३. साडी 'नेसणं'

“ठकू, हे एवढं लांबरुंद कापड इकडून तिकडून गुंडाळायचं हा निव्वळ शिवण्याचा आळस आहे. किती गैरसोयीचं आणि अशास्त्रीय आहे हे.” शास्त्रीय मैत्रीण साडीवर वैतागत म्हणाली. ठकू विचार करत राह्यली.भारतीय उपखंडातील गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये काळानुसार आणि प्रांतानुसार भरपूर विविधता आहे. जेव्हापासूनचे पक्के संदर्भ मिळतात...

Monday, May 18, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - २. नेसूचं आख्यान

“ठकू, हे बघ तुमचा तो कोण सब्यसाची काय म्हणतोय. भारतीय स्त्रियांना साडी नेसता येत नसेल तर लाजा वाटल्या पाहिजेत म्हणे! चला एकाला तरी संस्कृतीची चाड आहे या जगात. साडी म्हणजे आपली संस्कृती आहे. यासाठी म्हणूनच सांगतो की स्त्रियांनी साडीच नेसावी. आख्ख्या जगात कुठेही अश्या प्रकारचे वस्त्र नाही. फार बुद्धिमान...

कापडाचोपडाच्या गोष्टी - १. हे सगळं कुठून येतं?

‘बरंका ठकू, वस्त्रे केवळ लज्जारक्षणाकरता असतात. कपड्यापेक्षा मनाचे सौंदर्य महत्वाचे.’ साड्या खरेदी करता करता बकूमावशीने ठकूला उपदेश केला. तलम कॉटनची साडी अंगावर लावून बघत मानेनेच ‘कशी दिसते?’ हे ठकूला विचारले. “अगदी तुझ्यासारखी!” ठकूने खुश होऊन सांगितले. ती साडी नेसल्यावर तिच्या मनाचे सौंदर्य त्या साडीवर...

Search This Blog