Friday, September 25, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - सर्व लेखांचे दुवे.

 वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं. तर तेच सगळं तुमच्या पर्यंत पोचावं म्हणून जानेवारी २०१८ मधे लोकमतमधे हा विषय घेऊन सदर लिहिले होते. सदराचे नाव ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. थोडी गम्मत, थोडी...

Tuesday, June 16, 2020

तिचा वेष त्याचा वेष

“त्या बिचाऱ्या दिपिकेला आपले कपडे कुलुपात ठेवावे लागत असतील नै? कधी रणवीर डल्ला मारेल काय सांगता येतंय काय? ” रणवीर सिंगचे नवीन फोटो आले की व्हॉटसॅपवर किमान पंचवीसवेळातरी हा डबडा विनोद येतो.आपल्या मनाजोगी धडाडी न दाखवणाऱ्या पुरूषाला "बांगड्या भरा!" असा टोला मारणारे पैशाला पासरीभर असतात आणि त्यात काही...

Saturday, June 13, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - १२. अजून थोडी इतिहासाची पाने!

“कपड्यांची कथा! पण या सगळ्या कथेचा आपल्या आयुष्याशी कुठे संबंध येतो?” हुशार मकूने हुशार प्रश्न विचारला. ठकू समजावून सांगू लागली.अंगावर ल्यायलेली प्रत्येक गोष्ट, कपाटातली प्रत्येक वस्तू या सगळ्या कथेचा एक भाग आहे. आपलं कपाट उघडून पहा. सत्राशेसाठ प्रकारचे कपडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कापडे, वेगवेगळ्या...

Friday, June 12, 2020

प्रमोदबन - २

प्रमोदबनच्या घरात दार उघडल्या उघडल्या समोरच्या खिडकीला लागून कडाप्पा होता. म्हणजे भिंतीत बसवलेला ओटा होता ज्याचा वापर एखाद्या साइड टेबलसारखा होत असे. त्याच्या खाली भिंतीमध्ये चपला ठेवायचे शेल्फ होते. त्याचे नाव कडाप्पा कारण त्या ओट्याला वरती कडाप्पा घातलेला होता. तसा तो स्वैपाकघरातही ओट्याला आणि भांडी ठेवायच्या फडताळसदृश जागेला घातलेला होता. पण स्वैपाकघरात होते ते ओटा आणि शेल्फ. हा बाहेर होता त्याचेच...

Wednesday, June 10, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - ११. शब्देविण संवादु

“बाह्य सौंदर्याला अर्थ नाही. मनाचे सौंदर्य महत्वाचे.” सोशल मिडियावर एका ढुढ्ढाचार्यांनी ठामपणे आपले मत मांडले. मग कातडी आणि त्यावरच्या आवरणाकडे लक्ष देणाऱ्या बायकामुलींच्या गाभ्यात कांदेबटाटे आणि दुष्टपणा ठासून भरलेला असतो तो कसा हे सांगणाऱ्या प्रतिक्रियांचा त्या मतावर पाऊस पडू लागला.यात चुकीचे काही...

Sunday, June 7, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - १०. साधेपणाच्या नोंदी

“ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाह्यलीस का तिची? कॉटन बिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाईन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात? ”  ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रीणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूज काकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता. मस्तपैकी हातमागावरची साधी कॉटन साडी नेसल्या होत्या. ठकूच्या मैत्रिणीची साडी चारशे...

Search This Blog